Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Yantra : गणेश यंत्राने होतात अनेक समस्या दूर, काय आहे स्थापण करण्याचा विधी?

नवीन घराचे वास्तू पुजन असो, नवीन कार्यालयाचे उद्घाटन असो किंवा लग्नासारखे कोणतेही विधी असोत, ही सर्व कामे करताना कोणतेही अडथळे येऊ नयेत म्हणून गणेशपूजन केले जाते.

Ganesh Yantra : गणेश यंत्राने होतात अनेक समस्या दूर, काय आहे स्थापण करण्याचा विधी?
गणेश Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 10:55 PM

मुंबई : कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शिवपुत्र गणेशाची पूजा केली जाते. गणेशाला पहिले उपासक मानले जाते. एखादे पूजा-कार्यही केले जात असेल, तर त्यापूर्वी छोटी गणेशपूजा करणे बंधनकारक मानले जाते. गणेशाचे नामस्मरण केल्याने होणार्‍या कार्यातील सर्व अडथळे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. नवीन घराचे वास्तू पुजन असो, नवीन कार्यालयाचे उद्घाटन असो किंवा लग्नासारखे कोणतेही विधी असोत, ही सर्व कामे करताना कोणतेही अडथळे येऊ नयेत म्हणून गणेशपूजन केले जाते. आयुष्यातील छोटे अडथळे दूर करण्यासाठी काय करावे. यासाठी गणेशाशी संबंधित ज्योतिषशास्त्राचा उपायही आहे. गणेश यंत्र (Ganesh Yantra Upay) हे अत्यंत प्रभावी आहे. यामुळे अनेक समस्या दुर होतात.

अशा प्रकारे करा गणेश यंत्राची स्थापना

शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला ताम्रपटावर बनवलेले गणेश यंत्र शास्त्रोक्त शुभ मुहूर्तावर लावावे.  भगवान गणेश आणि देवी लक्ष्मी यांची एकत्रित शक्ती तुम्हाला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करते.

शुक्र या यंत्राचा स्वामी आहे, जो तुम्हाला जीवनात पुढे जाण्यास मदत करतो. यामुळे तुम्हाला जीवनात प्रसिद्धी आणि  नोबल मिळते. यामुळे तुमची आर्थिक बाजूही सुधारते. जर तुम्हाला स्थिर आणि उत्तम आर्थिक परिस्थिती तसेच जीवनात आनंद मिळवायचा असेल तर तुम्ही सक्रिय गणेश यंत्रांची  पूजा करा.

हे सुद्धा वाचा

पूजेच्या वेळी संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने गणेशजी प्रसन्न होतात.

दुसर्‍या पद्धतीनुसार श्री गणेश यंत्रासमोर गाईचे तूप मिसळलेले धान्य अर्पण केल्यास धन आणि धान्याची कमतरता भासत नाही.  एक हजार आहुती अर्पण केल्यास  15 दिवसात त्याची प्रचिती येते अशी धार्मिक मान्यता आहे.

परंतु जर तुम्हाला वरील पद्धती करता येत नसतील तर दररोज सकाळी स्नान केल्यानंतर गणेश यंत्रासमोर बसून मूळ मंत्र – ओम गं गणपतये नमः या मंत्राचा किमान तीन वेळा जप करा. तुमच्या आयुष्यात येणारे अडथळे आधीच त्याचा मार्ग बदलतील.

हे गणपती यंत्र निःसंशय चमत्कारी आहे. हे गणेश यंत्र मानवाची सर्व कामे सिद्ध करते. या यंत्राची पूजा केल्याने मनुष्याला श्रीगणेशाची कृपा लवकर प्राप्त होते आणि पूर्ण लाभ होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला.
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा.
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?.
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं.