मुंबई : पाच दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने मुंबईत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत विसर्जनाची तयारी पालिकेने केली आहे. त्यासाठी 73 नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि 173 ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत.
राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार, भाविकांनी विसर्जनस्थळी गणेश मुर्त्या पालिका कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करायच्या आहेत. पालिका कर्मचारी गणेश मुर्त्यांचे विसर्जन करणार आहेत.
मुंबईत एकूण 73 नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत. या नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध आहे. तसेच, सुमारे 173 ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्यात आले आहेत. कृत्रिम तलावात भाविकांनी गणेश मुर्त्यांचे विसर्जन करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.
गणेशोत्सवाला 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आहे. हा सण रविवार 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीपर्यंत असेल राहील. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. असे मानले जाते की या दिवशी दुपारी गणपतीचा जन्म झाला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त, गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत भारताच्या सर्व भागात 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे भक्त गणपतीची मूर्ती त्यांच्या घरी आणतात त्यांची विशेष पूजा करतात. श्रीगणेश दीड, 5, 7 किंवा 10 दिवस घरात विराजमान असतात. त्यानंतर त्यांचे विसर्जन केले जाते. आज पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे.
या 10 दिवसांमध्ये गणपतीला त्यांचे आवडते मोदक, लाडवांचं नैवेद्य अर्पण केले जाते. असे म्हटले जाते की गणपती दुःख दूर करणारा आणि सुख देणारा आहे. अशा स्थितीत जो कोणी या काळात प्रामाणिक अंतःकरणाने गणपतीची पूजा करतो, त्याला निश्चितच त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांच्या दुःखाचा अंत होतो.
? सकाळी : 06.01 ते 10.45 मिनिटे
? दुपारी : 05.03 ते 06.37 मिनिटे
? संध्याकाळी : 12.19 ते 10.54 मिनिटे
? रात्री : 1.45 ते 03.11 मिनिटे (मध्यरात्री, 15 सप्टेंबर)
दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप, ठाण्यात मोठा बंदोबस्त; भक्तांना अँटिजेन टेस्ट बंधनकारकhttps://t.co/wwCiNsmmfr#GaneshChaturthi | #GaneshChaturthi2021 | #Ganeshotsav | #idolimmersion | #thane
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 11, 2021
संबंधित बातम्या :
गणरायाच्या सजावटीसाठी शाळावर्गाची हुबेहूब प्रतिकृती; माजी विद्यार्थ्यांची भन्नाट आयडिया
Ganesh Festival 2021 | संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा, गणपती बाप्पा तुमची सगळी विघ्नं दूर करेल