मुंबई : हिंदू धर्मात कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीची पूजा करण्याची परंपरा आहे. फक्त श्रीगणेशाचे नाव घेतल्याने सर्व दु:ख आणि समस्या दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. श्रीगणेशाच्या विविध रूपांपैकी कोणत्याही एका रूपाची पूर्ण विधीपूर्वक पूजा करून घरात प्रतिष्ठापना केल्यास जीवनातील विघ्न दूर होतात. गणपतीची पूजा करण्यासाठी प्रत्येक दिवस शुभ आहे, मात्र गणेशोत्सवात गणपतीच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे. 19 सप्टेंबरला घरोघरी बाप्पांचे आगमण झाले असून गणेश विसर्जन 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. देशभरात दहा दिवसांच्या गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2023) उत्साह पाहायला मिळत आहे. आज आपण पंचमुखी गणेशाच्या मूर्तीचे महत्त्व जाणून घेऊया. असे मानले जाते की पंचमुखी गणेश हे चार दिशांचे आणि विश्वाचे प्रतीक आहे, जे चार दिशा आणि पंच तत्वांचे रक्षण करते.
पंच म्हणजे पाच आणि मुख म्हणजे तोंड. म्हणजे पाच चेहरे. म्हणून पाचमुखी गजाननाला पंचमुखी गणेश म्हणतात. श्रीगणेशाची ही पाच मुखं पंचकोशाचे प्रतीक मानली जातात. यांना पाच प्रकारचे शरीर म्हटले गेले आहे, जे पुढीलप्रमाणे आहेत-
या पाच कोशांचे ज्ञान झाल्यावर जो मनुष्य मुक्त होतो, तो ब्रह्मामध्ये लीन होतो, असे म्हणतात. भगवान गणेशाचे हे पाच मुख सृष्टीच्या या पाच रूपांचे प्रतीक आहेत.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)