Ganeshotsav 2024 : गणेशोत्सव कधी सुरू होणार? तारीख, योग्य शुभ मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घ्या…

गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे आठ दिवस उरले आहेत. बाप्पाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तर गणेश आगमनाची प्रचंड क्रेझ असते. या दहा दिवसामध्ये संपूर्ण देश उत्सवमय झालेला असतो.

Ganeshotsav 2024 : गणेशोत्सव कधी सुरू होणार? तारीख, योग्य शुभ मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घ्या...
Follow us
| Updated on: Aug 31, 2024 | 2:44 PM

अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात चतुर्थीच्या तिथीपासून दहा दिवस हा उत्सव साजरा केला जातो. या काळात गणपती बाप्पाची साग्रसंगीत पूजा केली जाते. बुद्धीच्या या देवतेच्या आगमनाची सर्वच लोक वाट पाहत असतात. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, गणपतीचा जन्म दुपारी झाला होता. त्यामुळे ही वेळ पूजेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दृक पंचागानुसार 7 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाचा आरंभ होतो. 10 दिवस म्हणजे 17 सप्टेंबरपर्यंत हा उत्सव चालणार आहे. 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते.

गणेश चतुर्थी कधी सुरू होणार?

दृक पंचागाच्यानुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षात चतुर्थीच्या तिथीचा आरंभ होतो. 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजून 1 मिनिटांनी ती सुरू होते. दुसऱ्या दिवशी 7 सप्टेंबर रोजी 5 वाजून 37 मिनिटांनी ती संपेल. त्यामुळे उदयतिथी लक्षात घेऊन 7 सप्टेंबर रोजी गणेशोत्सव सुरू होतो.

मध्यान्ह काळात पूजा

दृक पंचागानुसार या दिवशी मध्यान्ह काळात गणेशाची पूजा केली जाते. या पूजेचा मुहूर्त सकाळी 11.3 वाजल्यापासून ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत असणार आहे.

वर्जित चंद्रदर्शन काळ

दृक पंचागानुसार 7 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजल्यापासून ते रात्री 8.45 वाजेपर्यंत चंद्रदर्शन वर्जित असेल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन वर्जित मानलं आहे. या दिवशी चंद्र दर्शन केल्याने मिथ्या दोष किंवा कलंक लागतो अशी मान्यता आहे.

गणेश चतुर्थी पूजाविधी

गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठा. स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा

घरातील मंदिर स्वच्छ करा. एका चौरंगावर लाल रंगाचा कपडा अंथरा

आता शुभ मुहूर्तावर पूर्व वा उत्तर दिशेला गणेशाच्या मूर्तीची स्थापना करा

गणेश मूर्तीसह रिद्धी सिद्धीचीही स्थापना करा

आता गणेशाला हळद, दुर्वा, अत्तर, मोदक आणि चंदन आदी सामुग्री पूजेसाठी चढवा

गणेशाला धूप दाखवा, तसेच बाप्पासोबत इतर देवतांची आरती करा

पूजेच्यावेळी गणेशाचा बीज मंत्र ऊँ गं गणपतये नम: चा जप करा

( डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती सत्य असल्याचा आम्ही कोणताही दावा करत नाही. दंतकथा आणि परंपरागत चालत आलेल्या ऐकिव माहितीवर ही माहिती आधारीत आहे. या क्षेत्रातील संबंधितांचा सल्ला घ्यावा. )

आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.