Ganga Dussehra 2022: ‘या’ दिवशी करा पाण्याचे दान; मिळेल तपस्या करण्याचे पुण्य!

हिंदू धर्मात गंगा दसऱ्याला विशेष महत्त्व आहे. गंगा मातेला समर्पित, हा उत्सव ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी माता गंगा पृथ्वीवर अवतरली होती असे मानले जाते. गंगा दसर्‍याच्या (Ganga Dussehra 2022) दिवशी गंगेत स्नान करून दानधर्म केल्याने मनोकामना पूर्ण होतात. गंगा दसर्‍याच्या दिवशी मंदिरात जाऊन शिवलिंगाला गंगाजलाने स्नान करावे. असे […]

Ganga Dussehra 2022: 'या' दिवशी करा पाण्याचे दान; मिळेल तपस्या करण्याचे पुण्य!
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 2:03 PM

हिंदू धर्मात गंगा दसऱ्याला विशेष महत्त्व आहे. गंगा मातेला समर्पित, हा उत्सव ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी माता गंगा पृथ्वीवर अवतरली होती असे मानले जाते. गंगा दसर्‍याच्या (Ganga Dussehra 2022) दिवशी गंगेत स्नान करून दानधर्म केल्याने मनोकामना पूर्ण होतात. गंगा दसर्‍याच्या दिवशी मंदिरात जाऊन शिवलिंगाला गंगाजलाने स्नान करावे. असे मानले जाते की या दिवशी जल दान केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. माता गंगा ही भवतारिणी आहे. गंगा दसर्‍याचा दिवस पवित्र मानला जातो. या दिवशी गंगा मातेचे व्रत देखील ठेवावे. गंगाजल अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. कोणत्याही शुभ कार्यात आणि पूजाविधीमध्ये गंगाजलाचा वापर अवश्य होतो. गंगा दसर्‍याच्या दिवशी जलदानाला विशेष महत्त्व आहे.

गंगा दसर्‍याच्या दिवशी श्री सत्यनारायणाची कथा ऐकणे किंवा वाचणे खूप शुभ मानले जाते. या शुभ दिवशी, गंगा नदीत स्नान करा आणि कुटुंब निरोगी राहण्यासाठी माता गंगेची प्रार्थना करा. या दिवशी पाणी, अन्न, फळे, वस्त्र, मीठ, तेल, गूळ आणि सोन्याचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. गंगा दसर्‍याच्या दिवशी तहानलेल्या व्यक्तीला पाणी पाजल्याने अनेक साधनेसारखे  फळ मिळते. गंगेची उपासना केल्याने मांगलिक दोष आणि ऋणातून मुक्ती मिळते.

माता गंगा मानवाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर आली, ती शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी पृथ्वीवर अवतरली, म्हणून ही तिथी तिच्या नावाने गंगा दसरा म्हणून प्रसिद्ध झाली, यावेळी ही तिथी गुरुवार आणि हस्त नक्षत्र आहे. यावर्षी 9 जून 2022 रोजी गंगा दसरा साजरा केला जाणार आहे. या दिवशी रवि योगही तयार होत असून या दिवशी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्ष दशमी तिथी हस्त नक्षत्र व्यतिपात योग आणि कन्येचा चंद्र विराजमान आहे.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.