Ganga Saptami 2021 | आज गंगा सप्तमी, जाणून घ्या देवी गंगेच्या उत्पत्तीची कहाणी
दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी गंगा सप्तमी (Ganga Saptami 2021) साजरी केली जाते. धार्मिक दृष्टीने हा दिवस खूप शुभ मानला जातो.
मुंबई : दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी गंगा सप्तमी (Ganga Saptami 2021) साजरी केली जाते. धार्मिक दृष्टीने हा दिवस खूप शुभ मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी देवी गंगेची उत्पत्ती झाली होती आणि ती स्वर्गातून भगवान शिवच्या जटांमध्ये विराजमान झाली होती. म्हणून, हा दिवस गंगा जयंती आणि गंगा सप्तमी या नावांनी ओळखला जातो. या दिवशी गंगा स्नान आणि पूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे. यावेळी गंगा सप्तमी 18 मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. या उत्सवाशी संबंधित खास गोष्टी जाणून घ्या (Ganga Saptami 2021 Know The Tithi Importance Katha And Puja Vidhi).
गंगा सप्तमी तिथी प्रारंभ : 12 मे 2021 दुपारी 12:32 वाजता
गंगा सप्तमी तिथी समाप्त : 19 मे 2021 दुपारी 12:50 पर्यंत
गंगा सप्तमीचे महत्त्व
मान्यता आहे की, गंगा जयंतीच्या दिवशी देवी गंगेची पूजा करणे आणि गंगा स्नान केल्यास पापांचा नाश दूर होतो आणि यश आणि आदर वाढतो. याशिवाय, जे लोक मंगळदोष ग्रस्त आहेत त्यांना गंगा देवीच्या पूजेचा विशेष फायदा होतो. यावेळी गंगा जयंतीच्या दिवशी मंगळवार आहे, अशा परिस्थितीत मंगळदोष ग्रस्तांसाठी या दिवसाचे महत्त्व आणखी वाढले आहे. या दिवशी दानशूरपणालाही विशेष महत्त्व आहे, पूजा करुन, गरजूंना दान केल्याने जीवनातील त्रास दूर होतात.
भगीरथाच्या प्रयत्नांनी पृथ्वीवर अवतरतीत झाली होती गंगा
पुराणानुसार, गंगा देवी भगवान विष्णूच्या अंगठ्यातून निघाली होती. राजा सगर यांच्या 60,000 पुत्रांच्या राखेचा उद्धार करण्यासाठी त्या पृथ्वीवर आल्या. राजा सगरचे वंशज भागीरथाने कठोर तपश्चर्येनंतर गंगेला पृथ्वीवर घेऊन आले, म्हणूनच देवी गंगाला भागीरथी देखील म्हटले जाते. गंगेच्या स्पर्शाने सगरच्या 60 हजार पुत्रांचा उद्धार झाला होता.
देवी गंगेच्या उत्पत्तीची कहाणी
देवी गंगेच्या उत्पत्तीविषयी बर्याच कथा प्रचलित आहेत. एका कथेनुसार, भगवान विष्णूच्या पायाच्या घामाच्या थेंबातून गंगेचा जन्म झाला होता. या कथेनुसार, जेव्हा भगवान शिव यांनी नारद मुनी, ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यासमोर गाणे गायले तेव्हा भगवान विष्णूचा घाम वाहू लागला, ज्याला ब्रह्माजींनी त्यांच्या कमंडलात भरले. या कमांडलच्या पाण्यातून गंगेचा जन्म झाला.
दुसर्या आख्यायिकेनुसार, एकदा गंगा तिव्र गतीने प्रवाहित होत होती. त्यावेळी, जह्नू ऋषी परमेश्वराच्या ध्यानात विलीन होते आणि त्यांचं कमंडल आणि इतर वस्तूही तिथेच ठेवलेल्या होत्या. ज्यावेळी गंगाजी ऋषी जह्नू यांच्याजवळून प्रवाहित झाल्या तेव्हा त्यांचे कमंडल आणि इतर वस्तू आपल्यासमवेत नेल्या. जह्नू ऋषीचे डोळे उघडले तेव्हा त्यांनी आपले सामान न दिसल्याने ते क्रोधित झाले.
त्यांचा क्रोध इतका होता की त्यांनी रागाच्या भरात संपूर्ण गंगा प्यायली. त्यानंतर भागीरथ ऋषींनी जह्नू ऋषींकडे गंगेला मुक्त करण्याची विनंती केली. जह्नू ऋषींने भागीरथ ऋषींची विनंती मान्य केली आणि गंगा त्यांच्या कानातून बाहेर निघाली. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी गंगा सप्तमी होती.
Ganga Saptami 2021 | गंगा सप्तमी, जाणून घ्या याचं महत्त्व, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि कथाhttps://t.co/GX2fkp4cbi#GangaSaptami2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 13, 2021
Ganga Saptami 2021 Know The Tithi Importance Katha And Puja Vidhi
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Kedarnath Temple Open | महादेवाच्या जयजयकारात उघडली ‘केदारनाथ’ची कपाटं, घरबसल्या घ्या शिवाचं दर्शन!