Garud Puran : गरूड पूराणानुसार अशा लोकांच्या घरी चुकूनही करू नये भोजन, करावा लागतो समस्यांचा सामना
हिंदू धर्मातील 18 महापूराणांपैकी गरूड पूराण एक आहे. यामध्ये जीवन आणि मृत्यूच्या प्रवासाचे तसेच मृत्यू पश्चात मिळणाऱ्या सुख आणि दुःखाचे वर्णन केले आहे. जीवन जगताना व्यक्तीचे आचरण कसे असावे याबद्दलही यात माहिती देण्यात आली आहे. अन्न ग्रहण करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल गरूड पुराणात सांगितले आहे.
मुंबई : हिंदू धर्मातील सर्व पुराणांमध्ये गरूड पुराणाला (Garud Puran) सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. भगवान विष्णू हे गरूड पुराणाचे अधिपती मानले जातात. हिंदू मान्यतेनुसार, जर एखाद्या व्यक्तीने गरूड पुराणाचा पाठ अभ्यास केला किंवा ऐकला तर त्याला मोक्ष आणि गती प्राप्त होतो. वैष्णव संप्रदायाशी संबंधित या शास्त्रामध्ये सांगितले आहे की, ज्या घरात व्यक्तीला सतत नुकसान, तसेच अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो अशा व्यक्तीने कुणाच्याही घरात अन्न खाऊ नये. किंबहुना असे केल्याने व्यक्तीला नुकसान सहन करावे लागू शकते. गरूड पुराणात याविषयी सविस्तर माहिती दिली आहे, जाणून घेऊया कोणकोणत्या घरांमध्ये जेवल्याने नुकसान होऊ शकते.
सावकाराच्या घरी करू नये जेवण
गरुड पुराणानुसार, सावकाराच्या घरातील अन्न चुकूनही खाऊ नये. खरे तर असे लोकं इतरांनाच दुखावतात. त्यामुळे अशा घरांमध्ये जेवण करणे टाळावे.
गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांच्या ठिकाणी जेवू नये
गरूड पुराणात असेही सांगितले आहे की जुनाट आजार किंवा गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या ठिकाणी कधीही अन्न ग्रहण करू नये. कारण अशा ठिकाणी नकारात्मक उर्जा तसेच अस्वच्छता असते. यामुळे अन्न ग्रहण करणाऱ्याला अनेक समस्यांना समोर जावे लागू शकते.
अस्वच्छता असलेल्या घरी जेवू नये
ज्या घरात अस्वच्छता असते अशा घरात कधीही जेवण करू नये. ज्या घरात अस्वच्छता असते तिथे अनेक प्रकारच्या आजाराचे साम्राज्य असते. तसेच जिथे अस्वच्छता असते तिथे वास्तूदोषही असतो. या सर्व नकारात्मकतेचा परिणाम जेवणाऱ्याच्या शरिरावर तसेच मनावर होतो. आपण जसे अन्न ग्रहण करतो तसेच आपले विचार होतात आणि विचार आपले भाग्य घडवताता. त्यामुळे अस्वचछता असलेल्या घरी कधीही जेवू नये.
त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या घरी जेवू नका
गरुड पुराणानुसार, चुकूनही अशा लोकांच्या घरी जेवू नये जे फक्त इतरांना त्रास कसा देतात हे जाणतात. त्यामुळे अशा व्यक्तीच्या घरी जेवण्याचे आमंत्रण आले तर जेवायला जाणे टाळा. अशा लोकांच्या घरी जेवण केल्यास अन्न दोष लागतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)