Garud Puran: गरूड पुराणानुसार अशा लोकांकडे कधीच टिकत नाही पैसा, कायम होते अधोगती
. गरुड पुराणानुसार (Garud Puran) यामागील कारण मानवाचे काही कर्म आहेत. आयुष्यात त्यांच्याकडून झालेल्या चुकांमुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.
मुंबई, मानवी जीवनात पैशाला खूप महत्त्व आहे. पैशामुळेच सर्व भाैतीक गरजा भागविणे शक्य आहे. पैसा कमविण्यासाठी अनेकांना रात्रीचा दिवस करावा लागतो. माणूस त्यासाठी कठोर परिश्रम करतो, परंतु तरीही बऱ्याचदा त्याला अपेक्षित परिणाम मिळत नाही. गरुड पुराणानुसार (Garud Puran) यामागील कारण मानवाचे काही कर्म आहेत. आयुष्यात त्यांच्याकडून झालेल्या चुकांमुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे माणूस आर्थिक समस्येच्या गर्तेत अडकतो.
गरूड पुराणानूसार या चुका टाळाव्या
- तुम्ही आयुष्यात कितीही यशस्वी झालात तरीही. भरपूर पैसे कमवा, पण कधीही कोणाचा अपमान करण्याचा प्रयत्न करू नका. श्रीमंत लोक इतरांना अपमानित करण्याचा प्रयत्न करतात असे अनेकदा दिसून येते. गरुड पुराणानुसार असे करणे योग्य मानले जात नाही. अशा लोकांवर माता लक्ष्मी नाराज होते आणि दूर जाते.
- गरुड पुराणानुसार जे लोकं पैशाचा लोभी असतात ते कधीही सुखी राहू शकत नाहीत. याउलट, जे इतरांची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना कोणत्याही जन्मात समाधान मिळत नाही.
- गरुड पुराणानुसार इतरांची निंदा करणे किंवा टीका करणे हे पाप आहे. अशा स्थितीत माणसाने नेहमी आपल्या कामाशी संबंधित असले पाहिजे. असे लोक जीवनात यशस्वी होऊ शकत नाहीत.
- गरुड पुराणानुसार व्यक्तीने नेहमी स्वच्छ कपडे परिधान करावे आणि घर स्वच्छ ठेवावे. अशा घरात मां लक्ष्मीचा वास असतो, जिथे स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जाते.
- दही आरोग्यासाठी चांगले मानले जाते. पण गरुड पुराणानुसार रात्री कधीही दही खाऊ नये. रात्री दह्याचे सेवन केल्याने आयुर्मान कमी होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)