परक्या बाईच्या नादाला लागणाऱ्या पुरुषांना भयंकर शिक्षा; गरुड पुराण नेमकं काय सांगतं?
गरुड पुराणात विवाहबाह्य संबंध, कर्म आणि त्यांचे परिणाम याबद्दल सविस्तर वर्णन केलं आहे. स्त्री आणि पुरुष दोघांनाही त्यांच्या पापांसाठी भयंकर शिक्षा भोगावी लागते असं सांगण्यात आलं आहे.

हिंदू धर्मात गरुड पुराण एक पवित्र आणि महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. या पुराणात मृत्यू, कर्माचे फळ, कर्मानुसार शिक्षा आणि कर्मामुळे पुढील जन्म कोणता मिळेल याबाबत सविस्तर गोष्टी सांगितल्या आहेत. जसे आपण सर्व जाणतो की जर एखाद्या व्यक्तीने कोणतेही चुकीचे काम केले तर त्याच्या मृत्यूनंतर गरुडपुराणानुसार त्या आत्म्याला नरकात जावे लागते आणि त्या व्यक्तीला त्याच्या चुकीच्या कर्माची शिक्षा भोगावी लागते. मृत्यूचे देवता यमराज स्वत: त्या आत्म्याला शिक्षा देतात असं म्हटलं जातं.
पुराणात स्त्री-पुरुष संबंधांबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत
दरम्यान पुराणात स्त्री-पुरुष संबंधांबाबत देखील अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. जर एखाद्या महिलेचे किंवा पुरुषाचे विवाहबाह्य संबंध असतील तर त्यांना गरुण पुराणात कोणत्या प्रकारची शिक्षा देण्यात आली आहे. गरूडपुराणात काय म्हटलंय ते पाहुयात.
हिंदू धर्मात लग्नाला एक पवित्र बंधन मानले जाते, जर कोणत्याही स्त्री-पुरुषाने हे नाते मोडले आणि विवाहबाह्य संबंध ठेवले तर आपल्या गरुण पुराणानुसार तिला मृत्यूनंतर भयंकर शिक्षा सुनावली आहे.
महिलेला शिक्षा काय?
महिलेला धगधगत्या अग्नीत काठीला बांधून त्या अग्नीच्या वर ठेवले जाते आणि ती काठी यमाच्या सेवकांद्वारे गिरणीसारखी फिरवली जाते, त्यानंतर शिक्षा म्हणून त्या महिलेला चक्कीवर बसवले जाते. काटेरी पलंगावर झोपवले जाते, नंतर तिला लांब दोरीने बांधून उकळत्या तेलात तळले जाते. आणि ही भयानक शिक्षा तो पर्यंत दिली जाते, जोपर्यंत तिने केलेल्या चुकीच्या कृत्यांचा पश्चात्ताप होत नाही.
गरुडपुराणानुसार, शिक्षा पूर्ण झाल्यानंतर, स्त्रीला पृथ्वीवर शिक्षा भोगण्यासाठी कीटकाच्या रूपात जन्म मिळतो आणि या रूपात जन्म घेतल्यानंतर, तिच्याकडून केलेले चुकीचे कृत्य पूर्णपणे नष्ट होईपर्यंत तिला पृथ्वीवर राहावे लागते, जर या प्रजातीत राहून तिने केलेल्या पापांची शिक्षा तिने भोगली नाही, तर तिला पुन्हा यमराजांसमोर हजर केले जाते आणि जर तिने त्या प्रजातीत राहून कोणतेही पाप केले नसेल तर तिला पुढचा जन्म पुन्हा मानवी रूपात मुलगी म्हणूनच मिळतो.
पुरुषाला मिळणारी शिक्षा?
गरुडपुराणानुसार, जो व्यक्ती आपल्या पत्नीशी गैरवर्तन करतो तो पुढील जन्मात पक्षी बनतो. गरुड पुराण हे मृत्यूनंतरचे नवीन जीवन या संकल्पनेवर आधारित आहे. यामध्ये कर्मानुसार परिणाम स्पष्ट केले आहेत.
अंधतामिस्र नरक – जो व्यक्ती आपल्या पत्नीला फसवतो आणि दुसऱ्या स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवतो तो या नरकात जातो. येथे पापी व्यक्तीला रोज अनेक प्रकारच्या वेदना रोज दिल्या जातात, त्याच्या शरीराचे ठिकठिकाणी तुकडे केले जातात. अंधतामिस्रात पोहोचण्याआधीच, पापी जीव विविध प्रकारच्या दुःखांना बळी पडतो. पत्नीशिवाय दुसऱ्याच्या महिलेसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्याचा नरकात वाईट छळ होतो. विद्वान ऋषी या नरकाला अंधतामिस्र, अंधकारमय नरक असं म्हणतात .
तप्तसूर्मि नरक – जर एखादी व्यक्ती वासनेने भरलेली असेल आणि अनेक स्त्रियांशी संबंध ठेवत असेल तर यमदूत त्याला तप्तसूर्मि नावाच्या नरकात पाठवतो. या नरकात त्याला पुरुषाला तळपत्या लोखंडी जाड सळईभोवती गुंडाळला जातो. ज्यांचे पती किंवा पत्नीव्यतिरिक्त इतर कोणाशी शारीरिक संबंध आहेत, त्यांच्या अंगावर जळता लोखंड टाकला जातो आणि त्याला चाबकाने मारहाण केली जाते.
चुकीचे कर्म टाळणे म्हणूनच गरुडपुराणानुसार असे म्हटले जाते की आपण नेहमी चुकीचे कर्म करणे टाळले पाहिजे, अन्यथा आपल्याला देखील मृत्यूनंतर अशाच भयानक शिक्षेस सामोरे जावे लागेल. जे आपल्या पापांच्या आधारे गरुण पुराणात लिहिलेले असेल.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)