मेल्यानंतर ‘या’ 9 अवयवांतून बाहेर पडतो आत्मा; विज्ञानातही सिद्ध झालंय
गरुड पुराणानुसार मेल्यानंतर 9 अवयवातून आत्मा बाहेर पडतो. याबद्दल विज्ञानातही सिद्ध झालंय. गरुड पुराणात मृत्यूनंतरच्या प्रक्रियेचे सविस्तर वर्णन केलं गेलं आहे तसेच आत्म्याच्या प्रवासाचे मार्गही यात सांगण्यात आले आहेत.
आपल्या वेद-शास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये जन्म, मृत्यू, पूजा-विधी अशा, पाप-पुण्य अशा अनेक गोष्टींबद्दल सांगण्यात आलं आहे. त्यातलाच एक म्हणजे गरुड पुराण. गरुड पुराण हे हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक आहे. हे असे एकमेव पुराण आहे ज्यामध्ये जीवन आणि मृत्यूनंतरच्या घटनांचे स्पष्ट आणि सखोल वर्णन केले आहे. यासाठीच इतर सर्व पुराणांमध्ये गरुड पुराणाचे अतिशय खास आणि वेगळे महत्त्व आहे. जन्म मृत्यूच्या गोष्टींपैकी मृत्यूनंतर आत्मा शरिरातून कसा बाहेर येतो याबद्दल बऱ्याच जणांना प्रश्न पडतात. अनेकांना आत्मा हृदयाच्या भागातून बाहेर येते असं वाटतं याचे कारण अनेक चित्रपटात असे दाखवण्यात आले आहे. मात्र गरुड पुराणानुसार आत्मा हा शरीराच्या 9 भागांमधून बाहेर पडतो.
आत्मा शरीराच्या 9 पैकी कोणत्याही एका अवयवातून बाहेर पडतो. पुण्यवान आणि पापी माणूस आपला जीव कसा सोडतो? याबाबत नक्की काय सांगण्यात आले आहे, जाणून घ्या.
कोणत्या 9 अवयवांतून आत्मा बाहेर पडतो?
गरुड पुराणानुसार शरीरात नऊ दरवाजे आहेत ज्यातून प्राण म्हणजेच आत्मा बाहेर पडतो. हे दरवाजे आहेत दोन्ही डोळे, दोन्ही कान, तोंड, दोन्ही नाकपुड्या आणि शरीरातील दोन्ही उत्सर्जित अवयव. यापैकी एकाद्वारेच आत्मा शरीर सोडून जातो असे मानले जाते. गरुड पुराणात याचा उल्लेख करण्यात आलाय आणि विज्ञानातही हे सिद्ध झालं आहे. सर्वात पहिले आत्मा निघताना तो एक एक अवयव बंद पडू लागतो या बद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेलच. शिवाय डॉक्टरांकडूनही ऐकलं असेलच.
कोणाचा आत्मा मृत्यूनंतर कोणत्या अवयवातून बाहेर पडतो?
डोळ्यातून या व्यक्तीचा प्राण जातो
गरुड पुराणात असे म्हटले आहे की, जी व्यक्ती आयुष्यभर खूप आसक्त राहिली आहे, ज्याची आपल्या कुटुंबाशी गाढ आसक्ती आहे, अशा व्यक्तीची आत्मा त्याचा देह सोडायला तयार नसतात आणि यामुळेच मृत्यूच्या वेळी अशा लोकांचे डोळे उघडे राहतात. आसक्तीमुळे अशा लोकांना आपल्या प्राणांची आहुती द्यायची नसते. अशा स्थितीत यमराज बळजबरीने त्यांच्या शरीरातून आत्मा काढून घेतात, त्यामुळे त्यांचे डोळे उलटे फिरतात. असं म्हटलं जातं
सद्विचारी व्यक्तींचा आत्मा
गरुड पुराणात भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितले होते की असे लोक सत्कर्मात व्यस्त असतात. तसेच देवाची भक्ती आणि कर्मकांडानुसार पुण्य कर्म करणाऱ्या व्यक्ती या समाधानी असतात त्यामुळे त्यांचा मृत्यूही तितक्याच आनंदाने होतो. अशा लोकांचा जीव नाकातून बाहेर येतो. या प्रकारचा मृत्यू खूप शुभ मानला जातो. अशा व्यक्तीचा आत्मा मृत्यूनंतर वैकुंठाला जातो असेही गरुड पुराणात सांगण्यात आले आहे
पापी व्यक्तींचा आत्मा कसा बाहेर पडतो?
गरुड पुराणानुसार ज्या व्यक्तीने आयुष्यभर स्वार्थ साधला आहे. लोककल्याणाच्या कामांपासून दूर राहिले आहेत आणि अशा व्यक्ती ज्यांनी लैंगिक इच्छांना मुख्य ध्येय बनवले आहे. असे लोक त्यांच्या शेवटच्या क्षणी यमदूतांना समोर पाहून भीतीने थरथर कापतात. अस्वस्थतेमुळे त्यांचे आयुष्य खालच्या अंगाच्या दिशेने सरकते. यामुळेच त्यांचा प्राण शरीराच्या खालच्या उत्सर्जित अवयवातून बाहेर पडतो, म्हणजे मूत्रद्वार किंवा मलद्वारातून. मृत्यूच्या भीतीने अशा लोकांची विष्ठा आणि लघवीही कमी होते.
( डिस्क्लेमर : धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील माहिती ही उपलब्ध स्त्रोतांवरून दिली गेली आहे. यांच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)