Govardhan Puja : आज गोवर्धन पूजेच्या दिवशी अवश्य करा हे प्रभावी उपाय, लाभेल सुख समृद्धी

गोवर्धन पूजेच्या दिवशी लोकं घराच्या अंगणात किंवा घराबाहेर शेण टाकून गोवर्धन पर्वताचा आकार बनवतात आणि त्याची पूजा करतात. तसेच या दिवशी भगवान श्रीकृष्णाला विविध प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातात आणि त्यांच्या नावाने अन्नकूट तयार केला जातो.

Govardhan Puja : आज गोवर्धन पूजेच्या दिवशी अवश्य करा हे प्रभावी उपाय, लाभेल सुख समृद्धी
गोवर्धन पूजा Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 4:52 PM

मुंबई : आज 14 नोव्हेंबर रोजी गोवर्धन पूजा (Govardhan Puja) साजरी होत आहे. या दिवशी गाईच्या शेणापासून गोवर्धन बनवून त्याची पूजा करतात. आज मथुरेतील गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घातल्याने अनेक पटींनी अधिक शुभफळ प्राप्त होतात. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला गोवर्धन पूजा साजरी केली जाते. गोवर्धन पूजेच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने जीवनातील विविध समस्या दूर होतात. जोतिषी पराग कुळकर्णी यांच्याकडून जाणून घेऊया काही प्रभावी उपाय.

आज गोवर्धन पूजेच्या दिवशी करा हे प्रभावी उपाय

1. पूत्र प्राप्तीसाठी उपाय

गोवर्धन पूजेच्या दिवशी दूध, दही, मध, साखर आणि तूप यापासून पंचामृत तयार करा. यानंतर त्यामध्ये गंगाजल आणि तुळशीची डाळ टाका. पंचामृत तयार झाल्यावर शंखात भरून श्रीकृष्णाला पंचामृत अर्पण करावे. यानंतर “क्लीं कृष्ण क्लीं” या मंत्राचा 11 वेळा जप करा. मूल होण्याच्या तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

2. सुख आणि समृद्धीचे उपाय

गोवर्धन पूजेच्या दिवशी गाईला आंघोळ घालून  तिची पूजा करावी. त्यानंतर तीला खाद्य आणि चारा खायला द्या आणि गायीला सात वेळा प्रदक्षिणा घाला. असे केल्याने तुमच्या सर्व आर्थिक इच्छा पूर्ण होतील.

हे सुद्धा वाचा

3. धप्राप्तीसाठी उपाय

गोवर्धन पूजेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा, यामुळे धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडामध्ये वास करते आणि गोवर्धन पूजेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करण्यासोबत किमान 7 दिवे लावावेत.

4. आर्थिक समस्येचे निराकरण

गोवर्धन पूजेच्या वेळी 5 गोमती चक्र आणि 5 गायी एका ताटात ठेवा आणि त्यांची पूजा करा. पूजेनंतर, त्यांना उचलून घ्या, लाल कपड्यात बांधा आणि आपल्या तिजोरीत ठेवा. आज असे केल्याने तुमचे आर्थिक स्रोत वाढतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.