Gudi Padwa 2023 : या तारखेला साजरा होणार यंदाचा गुढी पाडवा, काय आहे या सणाचे महत्व?

हिंदू धर्माचे नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून (Gudipadwa 2023) सुरू होते. महाराष्ट्रात हा सण उत्साहात साजरा केला जातो. तथापि, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांमध्ये हा दिवस उगादी किंवा युगादी म्हणून साजरा केला जातो.

Gudi Padwa 2023 : या तारखेला साजरा होणार यंदाचा गुढी पाडवा, काय आहे या सणाचे महत्व?
गुडी पाडवाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 9:56 AM

मुंबई : हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून (Gudi Padwa 2023) होते. विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा उत्साह पाहायला मिळतो. याशिवाय आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्येही गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुढी म्हणजे विजय पताका. गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक गुडी उभारण्याची परंपरा आहे. मराठी लोकं गुढीपाडव्याच्या दिवशी घराबाहेर गुढी उभारून पूजा करतात. हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. गुढीपाडव्याची तारीख, पूजा पद्धत, कथा आणि महत्त्व जाणून घेउया. यावर्षी 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे. चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी 21 मार्च 2023 रोजी रात्री 10:52 पासून सुरू होईल आणि 22 मार्च 2023 रोजी रात्री 08:20 वाजता समाप्त होईल. अशा परिस्थितीत उदयतिथीनुसार 22 मार्च रोजी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे. दुसरीकडे, 22 मार्च 2023 रोजी 06:29 ते 07:39 ही वेळ पूजेसाठी शुभ राहील.

गुढी पाडवा पूजा पद्धत आणि परंपरा

गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याची परंपरा आहे. यासाठी काठीवर तांब्याचा लोटा उलटा ठेवून त्यावर लाल, पिवळे, भगवे रेशमी कापड बांधले जाते. फुलांच्या माळा आणि आंब्याच्या पानांनी सजवले जाते. गुढीपाडव्याला लोकं सूर्योदयाच्या वेळी अंगाला तेल लावून स्नान करतात. घराचा मुख्य दरवाजा आंब्यांच्या पानांचे आणि फुलांचे तोरण लावण्यात येते. रांगोळी काढली जाते. गुडी घराच्या बाहेर उभारली जाते. या दिवशी लोकं ब्रह्मदेवाची पूजा करतात आणि नंतर गुढी उभारतात.

गुढी पाडव्याची पौराणिक कथा

या उत्सवाशी संबंधित अशी एक मान्यता आहे की या दिवशी शालिवाहन नावाच्या कुंभार पुत्राने मातीच्या सैनिकांच्या सैन्याने आपल्या शत्रूंवर विजय मिळवला होता. याच कारणामुळे शालिवाहन शकही याच दिवशी सुरू होतो.

हे सुद्धा वाचा

गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली. या दिवसापासून सतयुग सुरू झाल्याचेही मानले जाते. पौराणिक कथांशी संबंधित अशी देखील एक मान्यता आहे की, गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान श्री रामाने बळीचा वध करून दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांना त्याच्या दहशतीपासून मुक्त केले. यानंतर येथील लोकांनी आनंद व्यक्त करत घरोघरी विजयाचा झेंडा फडकावला. ज्याला गुढी म्हणतात.

आदिशक्तीचे प्रकटीकरण चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झाले. या दिवशी गणितज्ञ भास्कराचार्य यांनीही तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण यांच्या आधारे पंचांग रचल्याचे सांगितले जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.