Gupt Navratri 2023 : गुप्त नवरात्रीत पूर्ण होतील सर्व मनोकामना, अशा प्रकारे करा देवीची आराधना
तंत्रविद्येसाठी गुप्त नवरात्री विशेष मानली जाते. यंदा 19 जूनपासून आषाढ नवरात्रीला सुरुवात होत आहे. आणि ती 28 जून रोजी संपणार आहे.
मुंबई : वर्षात चार नवरात्र येतात. त्यापैकी दोन नवरात्रांना दृश्य नवरात्र म्हणतात. ज्यामध्ये चैत्र आणि शारदीय नवरात्रीचा समावेश होतो. याशिवाय गुप्त नवरात्र (Gupt Navratri 2023) म्हणून ओळखल्या जाणार्या दोन नवरात्री माघा आणि आषाढ महिन्यात येतात. तंत्रविद्येसाठी गुप्त नवरात्री विशेष मानली जाते. यंदा 19 जूनपासून आषाढ नवरात्रीला सुरुवात होत आहे. आणि ती 28 जून रोजी संपणार आहे. गुप्त नवरात्रीत माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा-अर्चा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे सांगितले जाते. याशिवाय गुप्त नवरात्रीमध्ये काही उपाय केल्याने सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.
गुप्त नवरात्रीमध्ये करा हे खास उपाय करा
- ज्योतिष शास्त्रानुसार गुप्त नवरात्रीमध्ये पूजेदरम्यान माता दुर्गाला लाल रंगाची फुले अर्पण करावीत. असे म्हटले जाते की लाल रंगाचे फूल अर्पण केल्याने आई प्रसन्न होते आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करते.
- गुप्त नवरात्रीमध्ये माता दुर्गाला लाल रंगाची फुले तसेच दागिने अर्पण करावेत. असं म्हणतात की यामुळे वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात.
- गुप्त नवरात्रीच्या 9 दिवसांत घरामध्ये लवंग आणि कापूरने आरती करावी. असे म्हणतात की असे केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि समृद्धी येते.
- गुप्त नवरात्रीमध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावून माता दुर्गाच्या ‘ओम दूं दुर्गाय नमः’ या मंत्राचा जप करावा. यामुळे देवी लवकर प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देते.
- ज्योतिषांच्या मते, गुप्त नवरात्रीच्या नवमीच्या दिवशी नऊ मुलींना लोण्यापासून बनवलेली खीर खाऊ घाला आणि दक्षिणा देऊन त्यांना चरणस्पर्श करा. त्यामुळे करिअरमध्ये यश मिळते.
- गुप्त नवरात्रीच्या काळात 9 गोमती चक्रे घेऊन घरातील देवघरात माता दुर्गेसमोर ठेवा. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. यामुळे पैशाचा फायदा होतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)