Guru Purnima 2023 : या तारखेला साजरी होणार गुरू पौर्णिमा, गुरूचा आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी अवश्य करा हे कामं

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः गुरूशिवाय ज्ञान नाही, असे धर्मग्रंथात सांगितले आहे. गुरूशिवाय माणूस अज्ञानी राहतो. गुरु शिष्याच्या जीवनातील अंधार दूर करतात. ज्ञान मिळवण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरूंची सेवा आणि उपासना केली पाहिजे.

Guru Purnima 2023 : या तारखेला साजरी होणार गुरू पौर्णिमा, गुरूचा आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी अवश्य करा हे कामं
गुरू पौर्णिमाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 3:55 PM

मुंबई : पौर्णिमा तिथी दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी येते. अशा प्रकारे 3 जुलै ही आषाढ पौर्णिमा आहे. याला गुरुपौर्णिमा (Guru Purnima 2023) असेही म्हणतात. या दिवशी वेदांचे लेखक महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला. म्हणून आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी पूजेबरोबरच गुरूंचीही सेवा केली जाते. गुरूशिवाय ज्ञान नाही, असे धर्मग्रंथात सांगितले आहे. गुरूशिवाय माणूस अज्ञानी राहतो. गुरु शिष्याच्या जीवनातील अंधार दूर करतात. ज्ञान मिळवण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरूंची सेवा आणि उपासना केली पाहिजे. गुरूंच्या आशीर्वादाने व्यक्ती जीवनात उच्च स्थान प्राप्त करते. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची भक्तिभावाने पूजा व सेवा करावी. जाणून घेऊया गुरुपौर्णिमेची शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्त्व.

गुरु पौर्णिमा 2023 तारीख

पंचांगानुसार, यावर्षी आषाढ महिन्याची पौर्णिमा 2 जुलै 2023 रोजी रात्री 8.21 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 3 जुलै 2023 रोजी सायंकाळी 5.08 वाजता समाप्त होईल. उदय तिथी वैध असल्याने, या वर्षी गुरुपौर्णिमा सोमवार, 3 जुलै 2023 रोजी साजरी केली जाईल.ॉ

पूजा पद्धत

हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पौर्णिमेच्या तिथीला ब्रह्मबेलामध्ये उठल्यानंतर सर्वप्रथम भगवान विष्णू आणि वेदांचे निर्माते वेद व्यास यांना नमस्कार करावा. दैनंदिन विधी आटोपल्यावर गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करावे. आतां नवे वस्त्र परिधान करून आचमन करा. यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे. यावेळी खालील मंत्राचा जप करा

हे सुद्धा वाचा

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः

गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः

यानंतर भगवान विष्णू आणि वेद व्यास यांची फळे, फुले, धूप, दीप, अक्षत, हळद, दुर्वा इत्यादींनी पूजा करावी. गुरु चालिसा आणि गुरु कवच पठण करा. शेवटी प्रार्थना करून सामर्थ्य, बुद्धी, ज्ञान, सुख, समृद्धी, कीर्ती मिळावी मागावी. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्ञान शोधणार्‍या व्यक्तीने देवी सरस्वती आणि त्यांच्या गुरूंची पूजा करावी. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गुरूंची सेवा करावी. यासोबत आपल्या कुवतीनुसार दान आणि भेटवस्तू देऊन आपल्या गुरूंचे आशीर्वाद मिळवावे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.