Gurupushyamrut Yoga 2022: आज गुरुपुष्यामृत योग, काय आहे महत्त्व?

ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांचा उल्लेख असून पुष्य नक्षत्राचे खास महत्त्व आहे. गुरुपुष्यामृत योग हा दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो.

Gurupushyamrut Yoga 2022: आज गुरुपुष्यामृत योग, काय आहे महत्त्व?
आज गुरुपुष्यामृत योग Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 6:51 AM

गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग (Gurupushyamrut Yoga) तयार होतो. हा सर्व कार्यास शुभ समजला जातो. या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते असा समज आहे. मात्र हा योग शुभ असला, तरी या दिवशी विवाह करत नाहीत. कारण पुष्य नक्षत्र (Pushpa Nakshatra) विवाहास वर्ज्य मानले आहे. ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांचा उल्लेख असून पुष्य नक्षत्राचे खास महत्त्व आहे. गुरुपुष्यामृत योग हा दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो. गुरुपुष्यामृत योग आज  28 जुलैला येत आहे. हा योग शुभ मानला जातो आणि या दिवशी शुभं कामं केली जातात. या योगावर दागिने खरेदी, घराच्या बांधकामाला सुरवात केली जाते. हिंदू पंचांगानुसार गुरुपुष्यामृतयोग आज  सकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी सुरु होईल आणि उद्या सकाळी 6 वाजून 16 मिनिटांपर्यंत असेल.

ज्योतिषशास्त्रात या दिवशी दान केल्यास विशेष लाभ मिळतो, या दिवशी काही वस्तूंचं दान केलं तर विशेष पुण्य मिळते अशी मान्यता आहे.  या दिवशी तांदूळ, बूंदीचे लाडू, खिचडी, डाळ इत्यादींचं दान करणं शुभ मानलं जातं. या दिवशी गुंतवणूक करणं देखील शुभ मानलं जातं. यंदा गुरुपुष्यामृत योग आणि आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या एकाच दिवशी आले आहेत आणि त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

साधकासाठी फायदेशीर ”गुरुपुष्यामृत योग”

या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने विशेष लाभ मिळतो. या दिवशी देवी लक्ष्मीला पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी मिळते. या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. अशी आख्यायिका आहे की या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदैवतेची मनोभावे पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्र-तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे.

हे सुद्धा वाचा

पुष्य नक्षत्र म्हणजे काय

पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. या नक्षत्राचे शुभ चिन्ह गायीचे स्तन आहे. त्यांचा मान्यतेनुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृततुल्य मानले आहे. त्याच प्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधा सारखेच आहे. पौष्टिक, लाभकारी, आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारे.

या नक्षत्रात तीन तारका दिसतात जे बाणाप्रमाणे दिसून येतात. या बाणाचा वरचं टोक म्हणजे वरचा तारा पुष्य क्रांती वर पडतो. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगळदायी किंवा मांगलिक तारा असे ही म्हणतात. पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.