Guruwar Upay : गुरूवारच्या दिवशी करा हा गुळाचा हा उपाय, मिळेल प्रत्त्येक कामात यश
गुरु कमजोर असेल तर प्रत्येक कामात अपयश येते आणि आर्थिक चणचणही राहते. असे मानले जाते की गुरुवारी भगवान बृहस्पतीची पूजा करून व्रत केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
मुंबई : गुरुवार बृहस्पती देव, श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. या दिवशी या देवतांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. पत्रिकेत बृहस्पति बलवान असेल तर जीवनात खूप प्रगती होते. सर्व कामं यशस्वी होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. याउलट गुरु कमजोर असेल तर प्रत्येक कामात अपयश येते आणि आर्थिक चणचणही राहते. असे मानले जाते की गुरुवारी भगवान बृहस्पतीची पूजा करून व्रत केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी गुळाचे काही उपाय केल्याने सर्व समस्या दूर होतात. चला जाणून घेऊया गुरुवारी गुळाचे (Guruwar Gud Upay) हे उपाय कसे करता येतात.
हे गुळाचे उपाय आहेत अत्यंत प्रभावी
- गुरुवारी सकाळी आंघोळीनंतर केळीच्या झाडाला भिजवलेली हरभरा डाळ आणि गुळाचा गाळा घाला. असे सतत 5 गुरुवारपर्यंत केल्याने धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. यासोबतच मनोकामनाही पूर्ण होतात.
- गुरुवारी भगवान विष्णूला केळी अर्पण करावी. या दिवशी त्यांना पिवळी फुले, हरभरा डाळ आणि गुळ अर्पण करा. असे केल्याने भगवान विष्णूची कृपा होते आणि सुख-समृद्धी वाढते.
- गुळाचा खडा, 7 अख्ख्या हळदीच्या कांड्या आणि एक रुपयाचे नाणे पिवळ्या कपड्यात बांधून गुरुवारी संध्याकाळी अज्ञात स्थळी फेकून द्या. असे केल्याने अपूर्ण मनोकामना लवकर पूर्ण होतात असे मानले जाते.
- या दिवशी भगवान बृहस्पतिला गुळ अर्पण केल्याने बृहस्पति, सूर्य आणि मंगळ देखील सकारात्मक प्रभाव देतात. त्याच्या प्रभावामुळे गुरुवारी हे काम केल्याने तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही आणि काम सहज होईल. जर तुमच्या करिअरमध्ये अडथळा येत असेल किंवा तुम्ही मुलाखतीसाठी जात असाल तर घरातून बाहेर पडताना वाटेत गाईला मैदा किंवा गूळ खाऊ घालावा. असे केल्याने कामात यश मिळते असे मानले जाते.
- दर गुरुवारी एखाद्या गरजू व्यक्तीला गूळ दान केल्याने आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होऊ लागते. गुरुवारी पिठात गूळ भरून गायीला खाऊ घातल्यास लग्नातील अडथळे दूर होतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)