Guruwar Upay: आर्थिक समस्येने असाल त्रस्त, तर दर गुरुवारी करा हे सोपे उपाय
नेकांना वेळोवेळी आर्थिक समस्येला समोर जावे लागते. सतत आर्थिक चणचण जाणवत असते. या सगळ्यातून बहर निघण्यासाठी गुरुवारच्या दिवशी काही उपाय सुचविण्यात आलेले आहेत.
आज आश्विन कृष्ण पक्षातील पंचमी तिथी (Krushna Panchami) असून गुरुवार हा दिवस आहे. 15 सप्टेंबर रोजी दुपारी 11 वाजेपर्यंत पंचमी तिथी राहील, त्यानंतर षष्ठी तिथी सुरू होईल. 15 सप्टेंबरचा संपूर्ण दिवस पार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे 5.28 पर्यंत हर्ष योग (Harsha Yoga) राहील. हर्ष म्हणजे आनंद आणि उत्साह. त्यामुळे या योगात केलेल्या काही उपायांमुळे आनंद प्राप्त होतो आणि नशिबाचीदेखील साथ मिळते. अनेकांना वेळोवेळी आर्थिक समस्येला समोर जावे लागते. सतत आर्थिक चणचण जाणवत असते. शास्त्रात आठवड्यातील प्रत्येक दिवस एका देवाला समर्पित मानला जातो. बृहस्पतिव्यतिरिक्त गुरुवारचा दिवस जगाचे पालनहार भगवान विष्णूला समर्पित असते. जर प्रत्येक गुरुवारी एखाद्या व्यक्तीने काही उपाय केले तर त्याला नारायणाचा आशीर्वाद मिळतो. तसेच कुंडलीत गुरुची स्थिती अधिक चांगली होते. जर गुरु सामर्थ्यवान असेल तर ती व्यक्ती यशाच्या पायर्या चढते. यासाठी गुरुवारच्या दिवशी काही उपाय (Guruwar Upay) सुचविण्यात आलेले आहेत.
- जीवनात सुख, शांती आणि समृद्धी हवी असेल तर या दिवशी लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन देवीची पूजा करावी आणि तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येईल.
- जर तुमच्या जोडीदाराच्या हातून जास्त पैसे खर्च होत असतील, ज्यामुळे तुम्हालाही त्रास सहन करावा लागत आले, तर या दिवशी तुमच्या जोडीदाराला चांदीचा चंद्र धारण करा. असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या हातून होणारा पैसा खर्च नियंत्रणात येईल आणि तुमच्या समस्या दूर होतील.
- जर तुम्हाला तुमचे कार्य यशस्वी करायचे असेल तर या दिवशी तुमच्या इष्टदेवाची पूजा करावी आणि भगवत गीतेचे पठण करावे. भागवत गीतेचा एक अध्याय वाचणे देखील पुरेसे आहे. असे केल्याने तुमचे कार्य निश्चितच यशस्वी होईल.
- जर तुम्हाला तुमच्या वडिलधार्यांच्या आशीर्वादाने तुमचा व्यवसाय भरभराट होताना पाहायचा असेल तर या दिवशी हवनातील पदार्थांमध्ये तीळ मिसळून हवन करावे. अन्नदान करता येणे शक्य असल्यास निश्चित करावे. याने पितरांची कृपा राहील व कार्यातली बाधा नाहीशी होईल.
- वैवाहिक जीवनात समस्या येत असतील तर दुधाचे दान करा. गरजू व्यक्तींना तांदळाचे दान केल्याने देखील वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)