Guruwar Upay : अवश्य करा गुरूवारचे पाच सोपे उपाय, भगवान विष्णूची होईल कृपा

| Updated on: Jul 27, 2023 | 11:53 AM

गुरु ग्रह ज्याला देवांचे गुरू म्हटले जाते त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गुरुवारचा दिवस शुभ आहे. जो कोणी गुरुवारी (Guruwar Upay) विधीपूर्वक पूजा करतो, त्याला गुरु ग्रहाशी संबंधित शुभ परिणाम प्राप्त होतात.

Guruwar Upay : अवश्य करा गुरूवारचे पाच सोपे उपाय, भगवान विष्णूची होईल कृपा
भगवान विष्णू
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. असे मानले जाते की भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख-समृद्धी येते. याशिवाय गुरु ग्रह ज्याला देवांचे गुरू म्हटले जाते त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गुरुवारचा दिवस शुभ आहे. जो कोणी गुरुवारी (Guruwar Upay) विधीपूर्वक पूजा करतो, त्याला गुरु ग्रहाशी संबंधित शुभ परिणाम प्राप्त होतात, ज्यामुळे घरामध्ये समृद्धी येते आणि कुंडलीतील गुरु ग्रह बलवान होतो. गुरु ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन सकारात्मकतेने भरलेले असते. कधीही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत नाही, कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढतो, दीर्घायुष्य प्राप्त होते आणि वैवाहिक जीवनही आनंदी राहते. चला जाणून घेऊया गुरुवारी कोणते उपाय केल्याने तुम्हाला बृहस्पतिसह भगवान विष्णूची कृपा प्राप्त होईल.

गुरुवारी पिवळे कपडे घालणे शुभ असते

पत्रिकेतील गुरु ग्रह बलवान होण्यासाठी गुरुवारी पिवळे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते. भगवान बृहस्पतिला पिवळा रंग खूप प्रिय आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी पिवळे कपडे परिधान केल्याने साधकाच्या जीवनावर चांगला परिणाम होतो.

अशा प्रकारे करा भगवान विष्णूची पूजा

भगवान विष्णूच्या पूजेच्या वेळी त्यांना पिवळे फूल अर्पण करावे. भगवान विष्णूला गूळ आणि मसूर अर्पण करा. पंचामृत आणि तुळशीही ठेवा.

हे सुद्धा वाचा

विष्णु सहस्रनामाचे पठण

या दिवशी विष्णु सहस्रनामाचा पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे सर्व रखडलेली कामे पूर्ण होऊन प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.

पिंपळ, तुळशी आणि केळीच्या झाडाला पाणी द्यावे

भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरुवारी पिंपळ, तुळशी आणि केळीच्या झाडांची लागवड करावी. त्यानंतर त्यांची पूजा करावी. यामुळे कुंडलीत गुरु ग्रहाशी संबंधित शुभ परिणाम येऊ लागतात.

हळद किंवा केशर तिलक

भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांच्या पूजेच्या वेळी हळद किंवा केशराचा तिलक वापरावा. यानंतर स्वतः चंदनाचा टिळा लावावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)