मुंबई : हृतिक रोशन, जया बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या फिजा चित्रपटातील ‘पिया हाजी अली-पिया हाजी अली’ हे गाणे तुम्ही अनेकवेळा ऐकले असेल आणि त्यासोबत ते गुणगुणले देखील असेल. हे गाणे ऐकताच हाजी अली दर्ग्याला भेट देण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण होईल. हा दर्गा मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र स्थानांपैकी एक आहे. फक्त मुस्लिमच नाही तर अनेक हिंदूंचेदेखील हे श्रद्धास्थान आहे. वास्तविक, समुद्राच्या मध्यभागी बांधलेला हाजी अली दर्गा कधीच का बुडत नाही याबद्दल अनेकांना कुतूहल आहे. हाजी अली दर्गा (Haji Ali Dargah) मुंबईत आहे. अरबी समुद्राच्यामध्ये बांधलेला हा दर्गा 400 वर्षांपासून असाच आहे. हाजी अली दर्गा अरबी समुद्रात महालक्ष्मी मंदिराजवळ आहे. येथे केवळ मुस्लिमच नाही तर हिंदूही दर्शनाला येतात. इथे जाण्यासाठी छोट्या खडकांमधून जावे लागते.
सैय्यद पीर हाजी अली बुखारी यांच्या स्मरणार्थ हाजी अली दर्गा 1431 साली बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजातील लोकांची गर्दी येथे पाहायला मिळेल. याशिवाय, हे मुंबईतील सर्वात महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. हाजी अली ट्रस्टच्या माहितीनुसार, सय्यद पीर हाजी अली हे उझबेकिस्तानच्या बुखापा प्रांतातून भारतात आले होते.
जाणकार आणि सामान्य लोकांच्या मते, हाजी अली भारतात आले तेव्हा त्यांनी राहण्यासाठी मुंबईतील वरळी परिसराची निवड केली. असे म्हणतात की येथे राहात असतानाच त्यांना ही जागा खूप आवडू लागली. येथे राहून त्यांनी धर्मप्रसाराचा विचार केला. त्यांनी आईला पत्रही लिहून या जागेची माहिती दिली होती.
विशेष म्हणजे समुद्र कितीही उंच असला तरी ही जागा कधीच बुडत नाही. हा 400 वर्ष जुना दर्गा अनेक वेळा पुन्हा बांधण्यात आला आहे. हाजी अली शाह बुखारी यांच्या अदबामुळे आजही भरती-ओहोटीच्या वेळी समुद्र कधीच आपली मर्यादा तोडत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे.
तुम्ही येथे विमानाने देखील जाऊ शकता. मुंबई विमानतळापासून त्याचे अंतर 30 किलोमीटर आहे आणि सांताक्रूझ विमानतळापासून ते 26 किलोमीटर आहे. याशिवाय तुम्ही छत्रपती शिवाजी टर्मिनल रेल्वे स्टेशनवर जाऊ शकता. दर्ग्यात जाण्यासाठी तुम्हाला अनेक प्रवासी वाहान उपलब्ध होतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)