तुम्हालाही दारामागे कपडे टांगण्याची सवय आहे का? वेळीच बदला, काय सांगतं वास्तुशास्त्र?

दारामागे कपडे टांगण्याची सवय असेल तर वास्तुशास्त्रानुसार ही सवय लगेचच बदलली पाहिजे. यामागे वास्तुशास्त्रात अनेक कारणे सांगितली आहेत. तुम्हालाही हीच सवय असेल तर काय करावे यासाठी हा लेख नक्की वाचा.

तुम्हालाही दारामागे कपडे टांगण्याची सवय आहे का? वेळीच बदला, काय सांगतं वास्तुशास्त्र?
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 7:01 PM

वास्तुशास्त्रातील घराबाबत दिलेल्या अशा अनेक गोष्टीसंदर्भात आपल्याला माहित नसतं. त्यातीलच एक म्हणजे दारामागे कपडे टांगणे.आपल्यापैकी अनेकांना घरात दारामागे असलेल्या हुकवर कपडे टांगण्याची सवय असते. पण तुम्हाला माहितीये का की या सवयींचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

होय, वास्तुशास्त्रानुसार दरवाजामागे कपडे टांगल्याने अनेक अडचणी येऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार दरवाजामागे कपडे टांगल्याने सकारात्मक उर्जेचा प्रवाह अडतो, ज्यामुळे मानसिक तणाव, कुटुंबातील मतभेद आणि आर्थिक अडचणी होऊ शकतात. दरवाजा स्वच्छ आणि अनावश्यक कपड्यांपासून, किंवा वस्तूंपासून दूर ठेवणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले जाते.

दारामागे कपडे टांगणे सामान्यपणे वाटते. ही सवय आपल्या जीवनावर कशी परिणाम करते हे कादाचित 90 टक्के लोकांना माहित नसेल. वास्तुशास्त्रानुसार आणि काही तज्ञांच्या म्हणण्यानुसार दारामागे कपडे टांगणे हे शूभ कि अशूभ असतं ते जाणून घेऊयात.

दारामागे कपडे टांगणे म्हणजे….

वास्तुशास्त्रामध्ये दारांना खूप महत्त्व आहे, कारण दार ही अशी जागा आहे जिथून घरात ऊर्जा प्रवेश करते आणि बाहेर जाते. मग ती सकारात्मक ऊर्जा असो किंवा नकारात्मक. त्यामुळे जर दारामागे कपडे टांगले तर नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते त्यामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, जसे की मानसिक ताण, कुटुंबात असंतोष आणि आर्थिक संकट असं म्हटलं जातं.

दारामागे कपडे का टांगू नये?

जेव्हा दारामागे कपडे टांगले जातात, तेव्हा ती जागा एकतर गचाळ आणि अव्यवस्थित दिसते, ज्यामुळे मानसिक शांतीही भंग पावते. अव्यवस्था घरातील वातावरण तणावपूर्ण आणि अस्वस्थ करू शकते. याशिवाय, कपडे साठवल्याने घरात धूळ आणि घाणही पसरू शकते, ज्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तसेच ते धुळ बसलेले कपडे घातल्याने आपल्यााला नक्कीच त्रास होऊ शकतो.

सकारात्मकतेचा प्रवाह कमी होतो

कपडे टांगल्याने दार पूर्णपणे उघडणे आणि बंद करणे देखील कठीण होऊ शकते. याचा ऊर्जेच्या प्रवाहावर परिणाम होतो आणि सकारात्मकतेचा प्रवाह कमी होऊ शकतो. त्यामुळे, जर तुम्हाला घरातील वातावरण सकारात्मक ठेवायचे असेल, तर दारामागे कपडे टांगणे टाळावे.

दारामागे कपडे टांगण्याची सवय असेल तर काय करावे?

जर तुमच्याकडे दुसरा पर्याय नसेल आणि तुम्हाला दारामागे कपडे टांगण्याची सवय असेल, तर ते व्यवस्थित ठेवणे महत्त्वाचे आहे. कपडे स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करा. मळलेले किंवा जुने कपडे टांगणे टाळा. तसेच, ऊर्जा योग्य प्रकारे प्रवाहित होऊ शकेल यासाठी दार पूर्णपणे उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी पुरेशी जागा असावी.

( डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्त्रोतावरून घेण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.