Hanuman Jayanti 2021 | हनुमान जयंती, तुमच्या राशीनुसार नैवेद्य अर्पण करा, बजरंगबली होतील प्रसन्न
हिंदू कॅलेंडरनुसार हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti 2021) दिवशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाला पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. आज हनुमान जयंती आहे. हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
मुंबई : हिंदू कॅलेंडरनुसार हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti 2021) दिवशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाला पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. आज हनुमान जयंती आहे. हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. परंतु यावेळी कोरोनामुळे भाविकांना त्यांच्या घरी राहून प्रार्थना करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यावेळी मंगळवारी हनुमान जयंतीची तिथी आहे, जी बजरंगबलीच्या भक्तांसाठी अत्यंत शुभ मानली जाते (Hanuman Jayanti 2021 Offer These Prasad According To Your Zodiac Signs).
या दिवशी बजरंगबलीची पूजा केल्याने तुमचे सर्व कष्ट दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. याशिवाय, या दिवशी विशेष उपाय केल्याने ग्रह दोषांची समस्याही दूर होते, अशी मान्यता आहे.
हनुमान जयंतीच्या दिवशी विशेष पूजा-अर्चना केली जाते. या दिवशी चोला अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी आपल्या राशीनुसार नैवेद्य द्या. चला याबद्दल जाणून घेऊया –
राशीनुसार नैवेद्य
? मेष राशी – बेसनाचे लाडू
? वृषभ राशी – तुळशीचे बियाणे
? मिथुन राशी – तुळशी दल अर्पित
? कर्क राशी – बेसनाचा हलवा
? सिंह राशी – जलेबी
? कन्या राशी – चांदीचा अर्क प्रतिमेवर लावा
? तुळ राशी – मोतीचूरचे लाडू
? वृश्चिक राशी – बेसनाचे लाडू
? धनु राशी – मोतीचूरचे लाडू आणि तुळशी दल
? मकर राशी – मोतीचूरचे लाडू
? कुंभ राशी – शेंदुराचा लेप
? मीन राशी – लवंग अर्पण करा
पूजा शुभ काळ
पौर्णिमेच्या तिथीचा आरंभ – 26 एप्रिल 2021 रोजी दुपारी 12 वाजून 44 मिनिटांपासून ते 27 एप्रिल 2021 रात्री 9 वाजून 01 मिनिटांपर्यंत
हनुमान जयंतीचे महत्त्व
हनुमानजी हे भगवान शंकराचा अकरावा अवतार आहे. असे मानले जाते की हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता अंजनीच्या गर्भातून झाला होता. या दिवसाला चैत्र पौर्णिमा देखील म्हणतात. हनुमानजींना शक्ती, बुद्धिमत्ता आणि विद्येचे प्रतीक मानले जाते. हनुमानजी भक्तांचे दु:ख दूर करतात, म्हणून त्यांना संकटमोचन देखील म्हणतात. या दिवशी भाविक घरी सुंदरकांड पाठ करतात. असे केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते, अशी मान्यता आहे.
Hanuman Jayanti 2021 | हनुमान जयंतीला विशेष योगायोग, जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व आणि मंत्रhttps://t.co/Km0zcXpHgC#HanumanJayanti
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 27, 2021
Hanuman Jayanti 2021 Offer These Prasad According To Your Zodiac Signs
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Chaitra Purnima 2021 : आज चैत्र पौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व