Hanuman Jayanti 2023 : आज हनुमान जयंती, संकट दूर करण्यासाठी करा हा महाउपाय

दु:ख आणि संकटाच्या वेळी महाबली हनुमानाचे ध्यान केल्याने सर्व समस्या दूर होतात. हनुमान जयंतीला हनुमानजींची पूजा करण्याची प्रथा आहे.

Hanuman Jayanti 2023 : आज हनुमान जयंती, संकट दूर करण्यासाठी करा हा महाउपाय
हनुमान Image Credit source: Hanuman Jayanti
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 9:37 AM

मुंबई : आज हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2023) आहे. हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला झाला होता. या दिवशी बजरंगबलीची विशेष पूजा केल्याने समस्या तर दूर होतातच, शिवाय इच्छित परिणामही मिळतात. या दिवशी काही चमत्कारिक उपाय देखील खूप शुभ मानले जातात. चला जाणून घेऊया हनुमान जयंतीची शुभ वेळ आणि पूजेची पद्धत.

हनुमान जयंतीचे महत्त्व

दु:ख आणि संकटाच्या वेळी महाबली हनुमानाचे ध्यान केल्याने सर्व समस्या दूर होतात. हनुमान जयंतीला हनुमानजींची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यांच्या पूजनाने जिवनातील अडथळे दूर होतात. या दिवशी विशेष उपाय करून ग्रहदोष दुर करता येतो.

हनुमान जयंतीचा शुभ मुहूर्त

शुभ वेळ – सकाळी 06.06 ते 07.40 पर्यंत चारचा मुहूर्त – सकाळी 10.49 ते दुपारी 12.24 पर्यंत अभिजित मुहूर्त – सकाळी 11.59 ते दुपारी 12.49 पर्यंत लाभाचा मुहूर्त – दुपारी 12.24 ते 01.58 पर्यंत संध्याकाळची वेळ – संध्याकाळी 05.07 ते 06.41 पर्यंत रात्रीची वेळ – संध्याकाळी 06.42 ते 08.07 पर्यंत

हे सुद्धा वाचा

हनुमानजीची पूजा कशी करावी?

कोणत्याही शुभ मुहूर्तावर हनुमानजींची पूजा करता येते. ईशान्य दिशेला चौरंगावर लाल कापड टाका. हनुमानजीसोबत श्रीरामजींच्या फोटोची स्थापना करा. हनुमानजींना लाल फुले आणि रामाला पिवळी फुले आणि तुळस अर्पण करा.  प्रथम श्री राम, ऊँ राम रामाय नमः या मंत्राचा जप करा. त्यानंतर हनुमान जी ओम हं हनुमते नमः या मंत्राचा जप करा.

हनुमानजींची पूजा आणि उत्तम उपाय

दुपारी हनुमानजींची पूजा करावी. त्यांना बुंदीचे लाडू आणि तुळशीची डहाळ अर्पण करा. प्रथम श्रीरामाची स्तुती करा किंवा राम मंत्राचा जप करा. यानंतर 11 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करा. तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा.

आरोग्यासाठी उपाय

चांगल्या आरोग्यासाठी हनुमानाचा फोटो लावा, ज्यात ते संजीवनी जडीबुटी धारण करत आहेत. हनुमानासमोर तुपाचा दिवा लावा. हनुमानाला खीरचा नैवेद्य दाखवा. आरोग्य संरक्षणासाठी प्रार्थना करा.

बुद्धिमत्तेसाठी उपाय

देवघरात हनुमानाच्या मुर्तीची स्थापना करा.  हनुमानासमोर तुपाचा दिवा लावा. गूळाचा नैवेद्य दाखवा. शिक्षण, ज्ञान आणि बुद्धी मिळावी म्हणून प्रार्थना करा.

संकटावर मात करण्यासाठी

गदाधारी हनुमानाचा फोटो देवघरात लावा. हनुमानासमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा. यानंतर हनुमानाला शेंदूर अर्पण करा. संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करा.

आर्थिक संकट दुर करण्यासाठी

हृदयात सीता-राम असलेल्या हनुमानाच्या फोटोची स्थापना करा. फोटोसमोर तुपाचे नऊ दिवे लावा आणि त्यांना लाल फुले अर्पण करा. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी आणि कर्जापासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.