hariyali Amawashya: 28 जुलैला आहे दीप अमावस्या, मुहूर्त, महत्त्व आणि विधी

यावेळी 28 जुलै रोजी दीप अमावस्या (Deep Amawashya) येत आहे. दीप अमावास्येला हरियाली अमावस्या (Hariyali Amawasya) देखील म्हणतात.  या अमावस्येचे महत्त्व पुराणात सांगितले आहे. उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरु झाल्याने याला श्रावण अमावास्या म्हणतात तर महाराष्ट्रीयन लोकांसाठी ही आषाढी अमावास्या आहे. यानंतर मराठी श्रावण महिन्यास सुरुवात होते. असे मानले जाते की हरियाली अमावस्येला पितृ रुपात […]

hariyali Amawashya: 28 जुलैला आहे दीप अमावस्या, मुहूर्त, महत्त्व आणि विधी
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 2:20 PM

यावेळी 28 जुलै रोजी दीप अमावस्या (Deep Amawashya) येत आहे. दीप अमावास्येला हरियाली अमावस्या (Hariyali Amawasya) देखील म्हणतात.  या अमावस्येचे महत्त्व पुराणात सांगितले आहे. उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरु झाल्याने याला श्रावण अमावास्या म्हणतात तर महाराष्ट्रीयन लोकांसाठी ही आषाढी अमावास्या आहे. यानंतर मराठी श्रावण महिन्यास सुरुवात होते. असे मानले जाते की हरियाली अमावस्येला पितृ रुपात शिवाची पूजा केली जाते. यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते. हरियाली अमावस्येची तिथीही निसर्गाशी संबंधित असल्याचे मानले जाते. कारण यावेळी पावसामुळे सगळीकडे हिरवळ असते. यावेळी निसर्ग आपल्या सुंदर रुपात दिसतो. प्राचीन काळी हरियाली अमावस्येच्या दिवशी दंगल, जत्रा इत्यादी अनेक विशेष कार्यक्रम होत असत. चला जाणून घेऊया हरियाली अमावस्येचे महत्त्व काय आहे आणि त्याची खास वैशिष्ट्ये काय आहेत.

मुहूर्त

पंचांगानुसार दीप अमावस्या बुधवार 27 जुलैच्या रात्री 09:11 पासून सुरू होईल आणि गुरुवार, 28 जुलैच्या रात्री 11:24 पर्यंत राहील. दुसरीकडे, 28 जुलै रोजी उदया तिथी असल्याने या दिवशी व्रत ठेवणे खूप शुभ आहे. या दिवशी पुनर्वसु नक्षत्र सकाळी 7:05 पर्यंत आणि नंतर पुष्य नक्षत्र असल्यामुळे दोन शुभ योग तयार होणार आहेत. तर दुसरीकडे गुरु पुष्याच्या शुभ योगामुळे या तिथीचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

महत्त्व

दीप अमावस्येच्या दिवशी वृक्षारोपण केल्यास ग्रह दोष दूर होतात. अमावस्या तिथी देखील पूर्वजांशी संबंधित असल्याचे मानले जाते. आर्यमांना पूर्वजांमध्ये प्रमुख मानले जाते. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की ते स्वतः पूर्वजांपैकी मुख्य आर्यम आहेत. दीप अमावस्येच्या दिवशी वृक्षारोपण केल्याने पूर्वजांचे समाधानही होते, म्हणजेच या दिवशी झाडे लावून निसर्ग आणि माणूस दोघेही समाधानी राहून मनुष्याला सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देतात. दीप अमावस्येच्या या महत्त्वामुळे अनेक धार्मिक आणि सामाजिक संस्था या दिवशी वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करतात.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.