हसीन अंदाज… 150 रुपयात टूथपेस्टचा प्रचार… कोण आहे महाकुंभातील ‘परम सुंदरी’ साध्वी हर्षा रिछारिया?

प्रयागराजमधील कुंभमेळ्यात हर्षा रिछारिया नावाची एक सुंदर साध्वी चर्चेत आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेली हर्षा दोन वर्षांपूर्वी आध्यात्माकडे वळली आणि आता निरंजनी आखाड्याची शिष्य आहे. तिच्या आयुष्यातील संघर्ष आणि आध्यात्मिक प्रवासाची ही कहाणी खूप प्रेरणादायी आहे.

हसीन अंदाज... 150 रुपयात टूथपेस्टचा प्रचार... कोण आहे महाकुंभातील 'परम सुंदरी' साध्वी हर्षा रिछारिया?
Follow us
| Updated on: Jan 16, 2025 | 4:41 PM

प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. या महाकुंभासाठी देशविदेशातून भाविक आले आहेत. नागा साधू आणि वेगवेगळ्या आखाड्याचे विविध साधूही या महाकुंभात सामील झाले आहेत. प्रयागराजमध्ये पाय ठेवायला जागा नाही, एवढी गर्दी झाली आहे. या महाकुंभात एक परम सुंदरी साध्वीही दाखल झाली आहे. या सुंदरीच्या सौंदर्याची सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू आहे. या साध्वीला यूजर्स ट्रोल्सही करत आहेत. साध्वी बनण्यापूर्वी ही सुंदरी सोशल मीडिया इंफ्ल्यूएन्सर होती. दोन वर्षापूर्वी तिने आध्यात्माचा मार्ग निवडला. महामंडलेश्वर कैलाशनंदगिरी यांची शिष्या बनली. या सुंदरीचं नाव आहे हर्षा रिछारिया. ती भोपाळची राहणारी आहे. कौटुंबिक स्थिती हालाकीची असल्यानेच तिने लहान वयापासून कामाला सुरुवात केली होती.

कोण आहे परम सुंदरी साध्वी?

या सोशल मीडिया फेम साध्वीचं नाव हर्षा रिछारिया आहे. ती निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी श्री कैलाशनंदगिरी जी महाराज यांची शिष्य असल्याचं सांगते. एका मुलाखतीत तिने तिचं वय 30 असल्याचं सांगितलं. अँकरिंग आणि मॉडेलिंग करणाऱ्या हर्षाने दोन वर्षापूर्वीच आध्यात्माचा मार्ग निवडला. हर्षा ही मूळची भोपाळची आहे.

अँकरिंग करायची

साध्वीच्या रुपात व्हायरल झालेल्या हर्षा रिछारियाचे जुने फोटो आणि व्हिडिओ लोक शेअर करत आहेत. ती पूर्वी अँकर होती. भक्ती अल्बममध्ये तिने अभिनय केला होता. इन्स्टाग्रामवर ती कंटेट बनवते. तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये आध्यात्मिक संबंध आणि उत्तराखंडशी संबंधित उल्लेख आहे. तिची पोस्ट धार्मिक विषयावर आधारीत आहे. ती सोशल मीडियावर हिंदुत्ववादाची चर्चा करते. तिला अनेकदा कथित धमक्याही मिळालेल्या आहेत.

दोन वर्षात साध्वी बनली

हर्षाला सोशल मीडियावर सातत्याने ट्रोल केलं जात आहे. हर्षा काही महिन्यापूर्वी इव्हेंट करत असल्याचं तिच्या इन्स्टा पेजवरून स्पष्ट होतं. या इव्हेंटमध्ये ती अँकरिंग करताना दिसत आहे. मग दोन वर्षानंतर ती साध्वी कशी बनली?हा एक सवालच आहे.

लहान वयातच काम

एक अॅवार्ड मिळाल्यावर तिने तिच्या संघर्षाची कहाणी सोशल मीडियावर मांडली होती. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षापासूनच काम करावं लागल्याचं हर्षाने म्हटलं आहे. कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी तिला लहान वयात काम करावं लागलं होतं. तिने बीबीए केलं आहे.

टुथपेस्टच्या प्रचारासाठी….

सुरुवातीच्या काळात हर्षा एका सुपरमार्केटमध्ये टूथपेस्टसाठी प्रमोशनल अॅक्टिव्हिटी करत होती. त्यासाठी तिला दिवसाला 150 रुपये मिळायचे. अनुभवानंतर तिची कमाई 150 रुपये झाली होती. कुटुंबाच्या काळजीमुळे ती तणावात असायची. त्यामुळे ती अनेकदा आजारीही पडली. 18 वर्षाची असताना तिला अँकरिंगचं काम मिळालं. त्यामुळे तिला एका अँकरिंगसाठी 250 रुपये मिळायला लागले. त्यामुळे तिने हा जॉब स्वीकारला. अँकर झाल्यामुळे तिला नाव मिळालं. प्रसिद्धी मिळाली. शिवाय तिची कमाई सुद्धा वाढली.

वडिलांना कार गिफ्ट

हर्षाची कमाई चांगली सुरू झाली. त्यानंतर तिने 2015मध्ये तिच्या वडिलांना एक झक्कासपैकी कार भेट दिली. आईला घर भेट म्हणून द्यायचं होतं. पण कोव्हिडमुळे गणित गंडलं. आता तिच्या सर्व गोष्टी मार्गी लागत आहेत. नावासोबत प्रसिद्धीही मिळत आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 9 लाख फॉलोवर्स आहेत. आपण ट्रॅव्हलर आहोत असं हर्षा सांगत असते. ती मेकअप आर्टिस्ट आणि हेअर स्टायलिस्टही आहे. महाकुंभात मुलाखत देताना तिने सांगितली की मी निवांतपणे आध्यात्माच्या मार्गावर जाईन.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.