ही आहेत भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांची यादी, उत्पन्नाचा आकडा थक्क करणारा

केरळमधील त्रिवेंद्रम येथील पद्मनाभ स्वामी मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते. मंदिराच्या खजिन्यात हिरे, सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या 6 तिजोरींमध्ये 20 अब्ज डॉलर्सची संपत्ती असल्याचे सांगण्यात येते.

ही आहेत भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांची यादी, उत्पन्नाचा आकडा थक्क करणारा
साई बाबाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 18, 2024 | 10:16 AM

मुंबई : श्रद्धेचे केंद्र असण्याव्यतिरिक्त, भारतातील मंदिरे (Richest Temple in India)  समृद्ध धार्मिक वारसाचे प्रतीक आहेत. देशात अशी डझनभर मंदिरे आहेत, जिथे दरवर्षी कोट्यावधी रुपयांची देणगी भाविक सढळ हाताने देतात. आम्ही तुम्हाला अशाच 5 मंदिरांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये स्थित देवाच्या मुर्तीवर, सर्वात महागडे दागिने घातले जातात. तसेच बँक खात्यांमध्येही मोठी रक्कम जमा आहे. ही रक्कम जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

पद्मनाभ स्वामी मंदिर

केरळमधील त्रिवेंद्रम येथील पद्मनाभ स्वामी मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते. मंदिराच्या खजिन्यात हिरे, सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या 6 तिजोरींमध्ये 20 अब्ज डॉलर्सची संपत्ती असल्याचे सांगण्यात येते. मंदिरातील महाविष्णूची मूर्ती सोन्याची आहे. मूर्तीची अंदाजे किंमत 500 कोटी रुपये आहे. याशिवाय देवाकडे हजारो सोन्याच्या साखळ्या आहेत. यातील एक सोनसाखळी 18 फूट लांब आहे. त्याचबरोबर देवाचा पडदा 36 किलो सोन्याचा आहे.

तिरुपती बालाजी मंदिर

देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांच्या यादीत आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर दुसऱ्या क्रमांकावर आहे. मंदिर व्यवस्थापनानुसार, तिरुपती बालाजी मंदिरात सुमारे 5,300 कोटी रुपयांचे 11 टन सोने आणि 15,938 कोटी रुपयांची रोकड बँकांमध्ये जमा आहे. अशाप्रकारे या मंदिराची एकूण संपत्ती 2.50 लाख कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले. त्याच वेळी, भगवान तिरुपती बालाजीकडे 1.2 टन सोने आणि 10 टन चांदीचे दागिने आहेत.

हे सुद्धा वाचा

शिर्डीचे साईबाबा मंदिर

देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांच्या यादीत महाराष्ट्रातील शिर्डीचे साईबाबा मंदिर तिसऱ्या क्रमांकावर आहे. मंदिराजवळ 380 किलो सोने, 4428 किलो चांदी याशिवाय डॉलर आणि पौंड यांसारख्या विदेशी चलनाच्या रूपात मोठी रक्कम आहे. मंदिराने बँकेत सुमारे 2,500 कोटी रुपये जमा केले आहेत. साईबाबांकडे 50,53,17,473 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आहेत. याशिवाय 6,27,56,97488 रुपयांच्या मुदत ठेवी आहेत.

वैष्णो देवी मंदिर

वैष्णो देवी मंदिर, भारतातील मान्यताप्राप्त शक्तीपीठ मंदिरांपैकी एक, देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. मातेचे दर्शन घेण्यासाठी वर्षभर हजारो भाविक येथे येतात. येथील श्राइन बोर्डाला भक्तांकडून दरवर्षी ५०० कोटी रुपये मिळतात. सोन्या-चांदीबद्दल बोलायचे झाले तर माता वैष्णोदेवीच्या खजिन्यात 1,800 किलो सोने आणि 4,700 किलो चांदी आहे. याशिवाय 2000 ते 2020 दरम्यान 2,000 कोटी रुपयांची रोकड जमा झाली आहे.

सिद्धिविनायक मंदिर, मुंबई

मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर हे गणेशाला समर्पित आहे. सेलिब्रेटींपासून ते सर्वसामान्य नागरिक येथे डोके टेकवून बाप्पाचा आशिर्वाद घेण्यासाठी येतात. मिळालेल्या माहितीनुसार, भगवान सिद्धिविनायकाकडे 160 किलो सोने आहे. त्याच वेळी, मंदिराला 3.7 किलो सोन्याने मढवले आहे. देणगी आणि प्रसादातून मंदिराला वर्षाला सुमारे 125 कोटी रुपये मिळतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....