Holi 2021 | अंकांनुसार निवडा शुभ रंग, जाणून घ्या कुठल्या रंगाने होळी खेळणे ठरणार तुमच्यासाठी लकी…
होळीच्या रंगाचं फक्त एकमेकांना लावण्यापुरतंच महत्त्व नाहीये, तर त्याचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व देखील आहे (Numerology Pick Your Colour To Play Holi According To Your Birth Date).
मुंबई : होळीच्या दिवशी वैरपणाची, द्वेषाची भावना विसरुन एकमेकांना आलिंगन देत प्रेमाचे रंग उधळावे (Pick Your Colour To Play Holi) आणि रंगाच्या उत्सवात नात्यांना बहर आणावा, अशी आपली संस्कृती सांगते. भारतात होळीचा सण मोठा धुमधडाक्यात साजरा केला जातो. या दिवशी आबाल वृद्ध रंगात न्हावून निघतात. प्रत्येक रंगाचं त्याचं-त्याचं एक ठराविक वैशिष्ट्य आहे. होळीच्या रंगाचं फक्त एकमेकांना लावण्यापुरतंच महत्त्व नाहीये, तर त्याचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व देखील आहे (Numerology Pick Your Colour To Play Holi According To Your Birth Date).
आपल्या दुखा:ला आपण कसं गुडबाय करतो, होळीचे रंग आपल्या जीवनात कशा प्रकारे आनंद घेऊन येतात, हे जाणून घेणं सगळ्यांना आवडतं. चला तर मग आपण जाणून घेऊयात अंकशास्त्रानुसार कोणता रंग आपल्यासाठी शुभ आहे…
जन्मतिथी 1,10,19,28
आपल्यासाठी शुभ रंग लाल आहे. यावर्षी तुम्ही जर लाल रंगाने होळी खेळली तर ती तुमच्यासाठी ही होळी शुभ असेल. हा रंग वापरल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. एक अंक असलेल्यांवर भगवान सूर्यनारायणाची कृपा राहील.
जन्मतिथी 2,11,20,29
आपल्यासाठी शुभ रंग पांढरा आहे. पांढरा रंग आनंद, शीतलतेचे प्रतीक आहे. चंद्र ग्रह आपले मन शांत ठेवतो. यावर्षी आपण हिरव्या रंगाने होळी खेळल्यास तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी वाढेल. राग शांत होईल.
जन्मतिथी- 3, 12, 21, 30
आपल्यासाठी पिवळा रंग शुभ आहे. आपण या रंगाने होळी खेळल्यास आपल्या जीवनात सकारात्मकता येईल. विशेषत: मुलांनी या रंगाने खेळणं चांगलं राहिल.
जन्मतिथी- 4,13, 22, 31
जर आपण निळ्या रंगात होळी खेळणार असाल तर ही होळी आपल्यासाठी खूप शुभ असेल. या रंगाचा कपाळावर टिळा लावल्याने तुमच्या कामात वृद्धी होईल.
जन्मतिथी –5,14,23
हिरवा रंग आपल्यासाठी सर्वात शुभ आहे. हिरव्या रंगासह आपण होळी खेळलात तर नात्यातील कडवटपणा दूर होईल. गर्भवती महिला आणि विद्यार्थ्यांसाठी हा एक चांगला रंग आहे.
जन्मतिथी- 6, 15 24
या तारखेला जन्मलेल्यांसाठी शुभ रंग पांढरा आणि गुलाबी आहे. या रंगांनी होळी खेळल्यास कुटुंबात शांती आणि आनंद नांदेल. नवीन जोडप्यांनी गुलाबी रंगाने होळी खेळावी. जेणेकरुन त्यांच्या आयुष्यात प्रेम राहील.
जन्मतिथी- 7, 16, 25
तुमच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतात पण तुम्ही कोणतंही काम नेटाने पूर्ण करता. यंदाची होळी खेळण्यासाठी तुम्ही केशरी रंगाचा वापर करा. नारंगी रंग लाल आणि पिवळा मिसळून तयार होतो. या रंगाचा टिळा कपाळावर लावल्याने आपले सर्व त्रास दूर होतील.
जन्मतिथी- 8,17, 26
शनि पवित्रता आणि न्यायाचे प्रतीक आहे. 8 अंक असलेल्यांसाठी निळा रंग चांगला आहे. आपण या रंगाने होळी खेळल्यास घरात समृद्धी येईल. जीवनातील अडचणी दूर होतील. हा रंग श्वसन रोगांपासून मुक्त होण्यासाठी फायदेशीर आहे.
जन्मतिथी- 9,18, 27
तुमच्यासाठी शुभ रंग लाल आहे. या होळीला तुम्ही लाल रंगाने जरुर होळी खेळा. लाल रंग हा उत्स्फूर्ततेचा आणि आनंदाचं प्रतिक मानला जातो.
Holi 2021 | आयुष्यात आनंदाचा रंग हवा असेल तर तुमच्या राशीनुसार रंग निवडा आणि उत्साहात होळी साजरी करा…https://t.co/AzYdKZ3Auz#Holi2021 #ZodiacSigns
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 26, 2021
Numerology Pick Your Colour To Play Holi According To Your Birth Date
संबंधित बातम्या :
HOLI 2021 | होळीला 499 वर्षांनंतर दुर्मिळ योग, जाणून घ्या काय आहे खास…