Holi 2021 | होळी… राधा-कृष्णाच्या प्रेमाचा प्रतीक आहे हा सण…
प्रेमाचा हा उत्सव होळी भगवान कृष्ण आणि राधेच्या काळापासून साजरा केला जातो. चला जाणून घेऊ या पौराणिक कथेबाबत (Holi 2021 Radha Krishna Holi Story The Symbol Of Love)
मुंबई : आज होळीचा सण आहे. आजच्या दिवशी लोक एकमेकांना रंग-गुलाल लावतात (Radha Krishna Holi Story). लोक एकमेकांना मिठाई खाऊ घालतात आणि गळा भेट घेऊन शुभेच्छा देतात. होळीचा सण प्रेम आणि मैत्रीचा सण आहे. मानलं जातं की होळीच्या दिवशी वैरीही मनातील सर्व कटुता विसरुन एकमेकांची गळाभेट घेतात आणि रंग खेळतात. पण काय तुम्हाला माहिती आहे की रंग आणि प्रेमाचा हा उत्सव होळी भगवान कृष्ण आणि राधेच्या काळापासून साजरा केला जातो. चला जाणून घेऊ या पौराणिक कथेबाबत (Holi 2021 Radha Krishna Holi Story The Symbol Of Love) –
राधा-कृष्णच्या प्रेमाचा प्रतीक
एका कथेनुसार, होळीचा सण राधा-कृष्णाच्या प्रेमाचा सण म्हणूनही साजरा केला जातो. मान्यता आहे की एकदा सावळ्या रंगाचा भगवान श्रीकृष्णाने आपल्या आईला म्हणजेच यशोदेला एक प्रश्न विचारलं की ते राधासारखे गोरे का नाहीत. तर त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर देत यशोदा म्हणाल्या की राधाच्या चेहऱ्यावर रंग लाव, त्यामुळे राधाचा रंगही कृष्णासारखा होऊन जाईल. मग काय, कृष्णाने राधा आणि गोपिकांना रंग लावला आणि याप्रकारे होळीच्या सणाला सुरुवात झाली.
भारतात वेगवेगळ्या भागात होळीचा सण कसा साजरा होतो?
होळी एक असा सण आहे जो भारतासह जगभरात साजरा केला जातो. यामध्ये मथुरा, वृंदावन आणि बरसानाची होळी देशात सर्वाधिक प्रसिद्ध आहे. भगवान श्रीकृष्णाचा संबंध असलेला मथुरा आणि वृंदावनमध्ये 15 दिवसांपर्यंत होळीचा सण साजरा केला जातो. तर बरसानाची लट्ठमार होली देखील जग प्रसिद्ध आहे.
मध्य प्रदेशच्या मालवा परिसरात होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. जेव्हाकी हरियाणामध्ये हा सण वहिणी आणि दिरामध्ये हसत खेळत साजरी केली जाते. गुजरातच्या आदिवासींमध्ये होळी सर्वात मोठा सण मानला जातो.
शीख धर्मात दहावें गुरु श्री गुरु गोबिंद सिंहजी महाराजांनी होळीला वीरतेचा सण म्हणून परिवर्तित केला होता. या कारणाने पंजाबमध्ये या सणाला होला मोहल्लाच्या रुपात साजरं केलं जाते. या दिवशी ठिकठिकाणी नगर कीर्तन आयोजित केलं जाते आणि लोक एकमेकांना अबीर गुलाल लावतात.
Holi 2021 | अंकांनुसार निवडा शुभ रंग, जाणून घ्या कुठल्या रंगाने होळी खेळणे ठरणार तुमच्यासाठी लकी…https://t.co/4mn7L8qSvS#Holi2021 #HoliCelebration #FestivalOfColours
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 27, 2021
Holi 2021 Radha Krishna Holi Story The Symbol Of Love
संबंधित बातम्या :
Lathmar Holi 2021 | बरसाना येथे लठमार होळी, कधीपासून सुरु झाली ही परंपरा जाणून घ्या…