धुळे जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांच्या होळी सणाच वातावरण तयार झाले असून आदिवासी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाचा मानाचा समजला जाणारा भोंगाऱ्या सणाला सुरुवात झाली आहे.
शिरपूरच्या नजीकच्या नेवाली चोपडा नजीकचे उनपदेव व पांढरी येथे सोमवारी भोंगर्या बाजार मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात येत आहे मध्यप्रदेशच्या हद्दीवरील नेवाली येथील बाजारात आदिवासी बांधवांनी आपला सण साजरा करत गर्दी केली होती या निमित्ताने सातपुडा पर्वतांच्या रांगा लहानशा खेड्यातून आलेल्या आदिवासी बांधवांनी लोकगीतआपला सण साजरा करत गर्दी केली होती.
या सणानिमित्ताने सातपुडा पर्वतांच्या रांगातील लहानशा खेड्यातून आलेल्या आदिवासी बांधवांनी लोक गीत गायन बासरी व ढोलाच्या निनाद स्वरात रंगून गेलेले पाहायला मिळाले.
त्याच प्रमाणे उनपदेव पांढरी येथील सोमवारी हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते. यावेळी अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करताना दिसत आहेत.
होळी (Holi) म्हणजे रंगांचा सण, फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाते. होळी या सणाला महाराष्ट्रात शिमगा या नावाने ओळखतात. तर उत्तर भारतात (North India) याला दोला यात्रा किंवा होरी असे म्हटले जाते.