Holi 2023 : आर्थिक तंगीचा करत असाल सामना तर होळी दहनाच्या वेळी अवश्य करा हा उपाय
होलिका दहनाच्या दिवशी काही उपाय केल्याने सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. यासोबतच देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते.
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय योग्य वेळी आणि योग्य दिवशी केले तर ते खूप फायदेशीर ठरतात. जर तुम्ही देखील आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल किंवा तुमच्या नोकरी आणि व्यवसायातील समस्यांमुळे चिंतेत असाल तर होलिका दहनाच्या (Holi 2023) वेळी केलेले काही उपाय तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतात. होलिका दहनाच्या दिवशी काही उपाय केल्याने सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. यासोबतच देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते. जाणून घेऊया कोणते आहेत ते खास उपाय.
या उपायांनी होईल आर्थीक समस्या दुर
- खूप मेहनत करूनही तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर होलिका दहनाच्या दिवशी केलेल्या या उपायाने तुम्हाला यश मिळू शकते. होलिका दहनाच्या दिवशी जेथे होलिका दहन केले जाते, तेथे नारळ, पान, सुपारी इत्यादी अर्पण करा. यामुळे लवकरच नोकरी मिळेल.
- जर तुम्ही कोणत्याही परीक्षेची किंवा नोकरीची तयारी करत असाल आणि मेहनत करूनही त्यात यश मिळत नसेल, तर होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी घराच्या उत्तर दिशेला अखंड ज्योतीचा दिवा लावा. हा उपाय केल्याने तुम्हाला लवकरच फायदा होईल.
- जर तुम्ही दीर्घकाळ आर्थिक संकटातून जात असाल, तर होलिका दहनाच्या वेळी नारळाच्या कवटीमध्ये नारळाच्या बुच्या भरा. यानंतर ते होलिकेच्या जळत्या अग्नीत समर्पित करा. हा उपाय केल्याने धनलाभ होतो.
- जर तुम्हाला नोकरी किंवा बिझनेसची चिंता वाटत असेल तर होलिका दहनाच्या दिवशी आंघोळीनंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि मगच होलिका दहनासाठी जा. त्याआधी नारळ घेऊन आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या डोक्यावर लावावा. होलिका दहनाच्या वेळी हे नारळ आगीत टाकावे. यानंतर होलिकेची सात वेळा प्रदक्षिणा केल्याने नोकरी-व्यवसायातील अडचणी दूर होतात.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)