Holi 2024 : या वर्षी किती तारखेला साजरी होणार होळी? मुहूर्त आणि पूजा विधी
होलिका दहन होळीच्या एक दिवस आधी होते आणि त्यानंतर होळीचा म्हणजेच रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. होलिका दहन हा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होतो. पंचांगानुसार, यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा 24 मार्च रोजी सकाळी 9:54 वाजता सुरू होईल आणि 25 मार्च रोजी दुपारी 12:29 वाजता समाप्त होईल.
मुंबई : हिंदू धर्मात प्रत्येक सणाला स्वतःचे वेगळे महत्त्व असते आणि प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही ना काही कारण दडलेले असते. होळी (Holi 2024) हा सण अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो. जो देशाच्या कानाकोपऱ्यात थाटामाटात साजरा केला जातो. नवीन वर्ष सुरू होताच लोकं होळीची आतुरतेने वाट बघू लागतात कारण रंगांचा हा सण प्रेम आणि एकात्मतेचे प्रतीक आहे. या दिवशी लोकं रंग लावून एकमेकांप्रती आपुलकी व्यक्त करतात. जर तुम्हीही होळीची वाट पाहत असाल तर जाणून घेऊया या वर्षी होळी कोणत्या दिवशी साजरी केली जाणार आहे?
होलिका दहन 2024 तारीख
होलिका दहन होळीच्या एक दिवस आधी होते आणि त्यानंतर होळीचा म्हणजेच रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. होलिका दहन हा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होतो. पंचांगानुसार, यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा 24 मार्च रोजी सकाळी 9:54 वाजता सुरू होईल आणि 25 मार्च रोजी दुपारी 12:29 वाजता समाप्त होईल. अशा परिस्थितीत 24 मार्च रोजी होलिका दहन हा सण साजरा केला जाणार आहे. 24 मार्च रोजी रात्री 11:13 ते 12:27 पर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असेल.
होळी 2024 कधी आहे?
होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी होळीचा सण साजरा केला जातो आणि 24 मार्चला होलिका दहन होईल. त्यामुळे 25 मार्च रोजी होळी साजरी केली जाणार आहे. होळीच्या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून परस्परातील मतभेद दूर करतात आणि नाती मजबूत करण्याचा प्रयत्न करतात.
होलिका दहन पूजा पद्धत
होलिका दहनाच्या दिवशी होलिकाची पूजा केली जाते आणि ही पूजा घरातील महिला करतात. या दिवशी स्त्रिया सकाळी उठतात, आंघोळ करतात, स्वच्छ कपडे घालतात आणि नंतर पूजेची तयारी करतात. या दिवशी मंदिराजवळ लाकडापासून होलिका बनवली जाते आणि स्त्रिया तिच्याभोवती प्रदक्षीणा घालतात. त्यानंतर तेथे धान्य, वस्त्र, फळे अर्पण केली जातात. या दिवशी पूजेत 5 किंवा 7 प्रकारचे धान्य वापरले जाते आणि ते दान करण्याचीही परंपरा आहे. तेथे पूजा केल्यानंतर आपल्या घरी परत या आणि मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक बनवा आणि थोडे पाणी शिंपडा. यानंतर घरातील सर्वांना प्रसाद द्या आणि स्वतःही ग्रहण करा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)