Holi Date 2023: या वर्षी किती तारखेला आहे होळी, 7 की 8 मार्च? जाणून घ्या नेमकी तारीख?

पौराणिक कथेनुसार या दिवसाची सुरुवात हिरण्यकश्यपची बहीण होलिका दहनाने झाली, त्यामुळे होलिका दहन सुरू झाले आणि दुसऱ्या दिवशी रंगांनी होळी खेळली गेली.

Holi Date 2023: या वर्षी किती तारखेला आहे होळी, 7 की 8 मार्च? जाणून घ्या नेमकी तारीख?
होळीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 7:55 PM

मुंबई, होळी (Holi Date 2023) हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. हा 2 दिवसांचा सण आहे ज्यामध्ये पहिल्या दिवशी होलिका दहन साजरा केला जातो, ज्याला होळी म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात, ज्याला रंगपंचमी म्हणतात. रंग पंचमीच्या दिवशी रंग खेळला जातो. या दिवशी मनातील वैर विसरून लोकं मैत्रीचा हात पुढे करतात. पौराणिक कथेनुसार या दिवसाची सुरुवात हिरण्यकश्यपची बहीण होलिका दहनाने झाली, त्यामुळे होलिका दहन सुरू झाले आणि दुसऱ्या दिवशी रंगांनी होळी खेळली गेली. जाणून घ्या यावर्षी होलिका दहन कोणत्या दिवशी होणार आहे आणि कोणत्या दिवशी होळी खेळली जाईल?

होळी 2023 तारीख

हिंदू कॅलेंडरनुसार यंदा होलिका दहन 7 मार्चला होणार आहे. तर 8 मार्च रोजी रंगपंपमी साजरी होणार आहे. यावर्षी होलिका दहनचा शुभ मुहूर्त 7 मार्च रोजी संध्याकाळी 6.31 ते 8.58 पर्यंत असणार आहे. या काळात होलिका दहन करणे खूप शुभ मानले जाते.

होलिका दहनाची कथा

होलिका दहनाची कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी हिरण्यकश्यप नावाचा राजा राहत होता. हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा निस्सीम भक्त होता. आपला मुलगा भगवान विष्णूच्या पूजेत मग्न राहातो हे हिरण्यकश्यपला कधीही आवडले नाही.  त्यामुळे त्याने आपल्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला. एकदा हिरण्यकश्यपने आपली बहीण होलिकाला प्रल्हादासोबत अग्नीत बसण्यास सांगितले.

हे सुद्धा वाचा

पौराणिक कथेनुसार, होलिकाला अग्नीत न जळण्याचे वरदान होते, परंतु भगवान विष्णूच्या कोपामुळे होलिका आगीत जळून राख झाली आणि प्रल्हाद वाचला. तेव्हापासून होलिका दहन प्रचलित झाले आणि दरवर्षी होलिका दहन सुरू झाले.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.