Holika Dahan 2021 | होलिका दहनाच्या दिवशी चुकूनही ‘या’ गोष्टी करु नका, अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील…
होळीचा (Holi) सण 28 मार्च 2021 ला आहे. होळीच्या दिवशी होलिका दहन (Holika Dahan 2021) केलं जातं.
मुंबई : हिंदू पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीवर होळीचा सण साजरा केला जातो. यावेळी होळीचा (Holi) सण 28 मार्च 2021 ला आहे. होळीच्या दिवशी होलिका दहन (Holika Dahan 2021 ) केलं जातं. या दिवशी महिला आपल्या मुलांसाठी उपवास ठेवतात. मान्यता आहे की व्रत आणि पूजा-अर्चना केल्याने भगवान कृष्ण प्रसन्न होतात. आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात (Holika Dahan 2021 Do Not Do These Things On The Day Of Holika Dahan).
ज्योतिष शास्त्रानुसार मान्यता आहे की होलिका दहनाच्या दिवशी पूजा केल्याने घरात देवी लक्ष्मी वास करते आणि सुख-समृद्धी येते. यावेळी होलिका दहनाच्या दिवशी लक्ष्मी जयंतीही आहे. देवी लक्ष्मीची नियमानुसार विधीवत पूजा केल्याने तुमचे सर्व संकट दूर होऊन जातात. त्यामुळे होलिका दहनाला लोक वेगवेगळे उपाय करतात. या खास दिवशी काही अशी कामं आहेत जी चुकूनही करु नये. नाहीतर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.
होलिका दहनाच्या दिवशी या गोष्टी चुकूनही करु नका
1. होलिका दहनाच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करु नये. अशी मान्यता आहे की या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त असतो त्यामुळे या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणे टाळा. त्याशिवाय पांढऱ्या रंगाचे पदार्थही खाऊ नये.
2. होलिका दहनाच्या दिवशी कोणाला पैसे उधार देऊ नये. असं केल्याने घरात आर्थिक समस्या उद्भवते.
3. मान्यता आहे की होलिका दहनाच्या दिवशी डोकं झाकून पूजा करावी. महिला असो वा पुरुष सर्वांनी डोकं झाकुनचं पूजा करावी.
4. नव्या जोडप्याने होलिका दहनाची पूजा पाहू नये, याचा विपरित परिणां त्यांच्या वैवाहिक जीवनावर होतो. त्याशिवाय या दिवशी कुठलंही शुभ कार्य करु नये.
5. होलिका दहनाच्या दिवशी रस्त्यावर पडलेली कुठल्याही वस्तूला स्पर्श करु नये. ते कुठल्या प्रकारचं जादू-टोणा केलेलं असू शकतं. त्यामुळे अशा कुठल्याच गोष्टीला हात लावू नये.
Holi 2021 | होलिका दहनाच्या राखेने घरात करा हे उपाय, सर्व संकटं होतील दूर…https://t.co/18JNFw82Xo#Holi2021 #holikadahan
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 27, 2021
Holika Dahan 2021 Do Not Do These Things On The Day Of Holika Dahan
संबंधित बातम्या :