Holika Dahan : होळी होळीच्या राखेचा हा उपाय आहे अत्यंत प्रभावी, दुर होतील सर्व समस्या

सर्व हिंदू घरांमध्ये होलिका दहनानंतर पूजा करण्याची परंपरा आहे. पूजेनंतर होलिका दहनाची राख घरी आणली जाते. होलिका दहनाच्या राखीचे विशेष महत्त्व मानले गेले आहे. 

Holika Dahan : होळी होळीच्या राखेचा हा उपाय आहे अत्यंत प्रभावी, दुर होतील सर्व समस्या
होलीका दहनImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 1:10 PM

मुंबई : वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेले होलिका दहन (Holika Dahan) यावर्षी 06 मार्च म्हणजे आज होणार आहे. दुसऱ्या दिवशी होळीचा सण देशात आणि जगात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. धार्मिक दृष्टिकोनातून होलिकेला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व तीच्या राखेलाही देण्यात आले आहे. होलिका दहनाच्या भस्मामुळे आयुष्यात येणारे संकट दूर होतात. यासोबतच आर्थिक समस्या दुर होऊ शकते. होलिका दहन सोबतच नकारात्मक उर्जेचा प्रभावही जीवनात कमी होतो असे मानले जाते. सर्व हिंदू घरांमध्ये होलिका दहनानंतर पूजा करण्याची परंपरा आहे. पूजेनंतर होलिका दहनाची राख घरी आणली जाते. होलिका दहनाच्या राखीचे विशेष महत्त्व मानले गेले आहे.  याच्या वापराने घरातील सर्वात मोठा वास्तुदोषही निघून जातो. होलिका दहनाची राख शांती आणि समृद्धीसाठी दोन प्रकारे वापरली जाऊ शकते.

होळीच्या राखेमुळे जीवनात आनंद येईल

होळीची राख आणि तांब्याची सात नाणी एका लाल रंगाच्या कापडात बांधून तिजोरीत ठेवल्यास घरात धनधान्य संपत्ती नांदते असं म्हणतात. आर्थिक वृद्धीसाठी ही राख म्हणजे जणू वरदान. इतकंच नव्हे, तर घरावर असणाऱ्या वाईट प्रवृत्तींच्या नजरा दूर पळवून लावण्यासाठीसुद्धा ही राख फायद्याची. यासाठी होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास राख आणा आणि यामध्ये मीठ, राई मिसळून ती घरातील गुप्त स्थानी ठेवा.

अशीही धारणा आहे, की जी मंडळी सतत आजारी असतात त्यांनी साधारण महिनाभर (होलिका दहनापासून एक महिना) कपाळावर ही राख टीळा म्हणून लावावी. याचे परिणाम लगेचच दिसू लागतील. नवग्रहांच्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात होळीची राख मिसळावी. यामुळं आर्थिक आणि शारीरिक फायदा होतो.

हे सुद्धा वाचा

इतकंच नव्हे, तर घरात सुखशांती नांदत नसेल, तर होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे, थोडी राख घराच्या कोपऱ्यात उडवा. हा उपाय सकाळच्याच वेळेत करा. एक बाब लक्षात ठेवा की इतर कुणी हे पाहणार नाही. यामुळं गृहक्लेश दूर होण्यासोबतच घरातील सदस्यांमध्ये असणारे मतभेदही दूर होतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.