Ravana | रावणाचा जन्म कसा झाला? ब्राह्मण पुत्र कुठल्या घटनेमुळे राक्षस ठरला? जाणून घ्या
हिंदू धर्मावर विश्वास ठेवणार लंकापती रावणाला अनिती, व्याभिचार, गर्विष्ठता, काम, क्रोध, लोभ, अधर्माचे आणि वाईटाचे प्रतीक मानतात (How The Ravana Was Born) आणि त्याचा द्वेष करतात.
मुंबई : हिंदू धर्मावर विश्वास ठेवणार लंकापती रावणाला अनिती, व्याभिचार, गर्विष्ठता, काम, क्रोध, लोभ, अधर्माचे आणि वाईटाचे प्रतीक मानतात (How The Ravana Was Born) आणि त्याचा द्वेष करतात. परंतु आपण हे विसरु नये की दशानन रावण एक राक्षस होता पण तो एक विद्वान देखील होता (How The Ravana Was Born Know The Strange Story ).
रावणाच्या जन्माच्या वेळी असं काय घडले होते ज्यामुळे एक ब्राह्मण पुत्र असूनही त्यांच्यात राक्षसी गुण आले, चला जाणून घेऊ रावणाच्या जन्माची कथा –
रावणाच्या जन्माची कथा –
हिंदू धर्मात रामायण हे एक पवित्र पुस्तक मानले जाते. ज्यात भगवान श्री राम यांचे संपूर्ण वर्णन केले आहे आणि भगवान श्री रामांच्या जीवनकाळात रावणाला विशेष महत्त्व आहे. रामायण वाचताना असे वाटते की या पुस्तकाची रचना रावणाशिवाय अपूर्ण राहिली असती.
हे आपल्या सर्वांना माहित आहे की रावण हा सोन्याच्या लंकेचा राजा होता. परंतु रावणाच्या जन्माशी संबंधित अनेक कथा हिंदू धर्माच्या अनेक ग्रंथात सापडतात. वाल्मिकी रामायणानुसार, रावण पुलत्स्य मुनीचे पुत्र महर्षि विश्रवा आणि राक्षसी कैकसीचा मुलगा होता.
वाल्मिकी रामायणच्या उत्तरकांडातील वर्णनानुसार, पौराणिक काळात माली, सुमाली आणि मलेवण नावाचे अत्यंत क्रूर राक्षस भावंड होती. या तिन्ही भावांनी ब्रह्माची कठोर तपस्या केली, ज्यामुळे प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्यांना बलशाली होण्याचे वरदान दिले.
ब्रम्हाजींकडून वरदान मिळाल्यानंतर तिन्ही भावांनी स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोक येथील देवतांसहित ऋषी-मुनी आणि मानवांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. पण जेव्हा या तिन्ही भावांचा अत्याचार मोठ्या प्रमामात वाढला तेव्हा ऋषी-मुनी आणि देवता भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांच्याकडे माली, सुमाली आणि मलेवण यांनी तिन्ही भावांच्या अत्याचाराचे वर्णन केले.
त्यानंतर भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले की तुम्ही सर्व तुमच्या तुमच्या लोकात जावा आणि निर्भयपणे राहा. मी या दुष्ट राक्षसांचा नक्कीच विनाश करेन. दुसरीकडे, या तिन्ही भावांना याची माहिती मिळाली तेव्हा माली, सुमाली आणि मालवण यांनी त्याच्या सैन्यासह इंद्रलोकवर हल्ला केला. यानंतर भगवान विष्णू इंद्रलोकात आले आणि त्यांनी राक्षसांचा संहार करण्यास सुरवात केली. भगवान विष्णू रणक्षेत्रात आल्यानंतर काही क्षणानंतर सेनापती माली यांच्यासह अनेक भुते मारले गेले आणि बाकीचे लंकेकडे पळून गेले.
त्यानंतर, उर्वरित राक्षसांनी सुमालीच्या नेतृत्वात लंका सोडली आणि पाताळात स्थायिक झाले. युद्धामधील पराभवानंतर सुमाली आणि मलेवण आपल्या कुटुंबियांसमवेत बराच काळ पाताळात लपून राहिले.
एके दिवशी सुमाली पृथ्वी लोकवर फिरायला आला आणि त्याने कुबेराला पाहिलं पण देवांच्या भीतीमुळे तो परत पाताळ लोककडे परत गेला. जेव्हा तो पाताल लोकल गेला तेव्हा त्याने विचार केला की देवांच्या भीतीमुळे आपल्याला किती काळ इथे राहावे लागेल?
असा कोणता उपाय करावा की ज्यामुळे देवांवर विजय प्राप्त करता येईल. काही क्षणानंतर त्यांना कुबेर लक्षात आले. तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की आपल्या मुलीचे लग्न ऋषी विश्रवाबरोबर केला तर, जेणेकरुन त्याला कुबेरासारखा तेजस्वी मुलगा सहज होईल.
काही काळानंतर तीच कल्पना मनात ठेवून सुमाली आपली मुलगी कैकसीकडे गेले आणि तिला म्हणाले, “मुली, तू लग्नाच्या योग्य झाली आहेस, परंतु माझ्या भीतीमुळे कुणीही तुझा हात मागायला माझ्याकडे आला नाही. त्यामुळे राक्षस वंशच्या कल्याणासाठी माझी अशी इच्छा आहे की तू परमपराक्रमी महर्षि विश्रवाकडे जावून त्यांच्याशी विवाह करावा आणि पुत्र प्राप्त करावा. तोच पुत्र देवतांपासून आम्हा राक्षसांचं रक्षण करु शकतो”.
राक्षसी असूनही कैकसी एक धार्मिक स्त्री होती. म्हणून कैकसीने आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करणे आपला धर्म मानले आणि लग्नासाठी संमती दिली. त्यानंतर कैकसीने तिच्या वडिलांना नमन केले आणि त्यांच्या आज्ञेनुसार महर्षि विश्रवांना भेटायला पृथ्वीवर गेली.
पाताळलोकातून पृथ्वीलोकवर येण्यासाठी कैकसीला बराच वेळ लागला आणि जेव्हा ती महर्षि विश्रवांच्या आश्रमात पोहोचली तेव्हा संध्याकाळ झाली होती. त्यावेळी भनायक वादळी वारा वाहत होता. मुसळधार पाऊस पडत होता. आश्रमात पोहोचताल कैकसीने सर्वात आधी महर्षिंचे तरण स्पर्श केले आणि त्यांना आपल्या मनाची इच्छा सांगितली.
कैकसीची इच्छा जाणून घेतल्यानंतर, महर्षि विश्रवा म्हणाले, “हे भद्रे, मी तुमची इच्छा पूर्ण करेन, परंतु तुम्ही कुबेलामध्ये माझ्याकडे आल्या आहात म्हणून माझे मुलं क्रूर कृत्ये करणारे असतील, त्या राक्षसांचे स्वरुप देखील भयानक असेल.”
महर्षि विश्रवाचे शब्द ऐकून कैकसीने त्यांना प्राणाम केला आणि म्हणाली “हे ब्राह्मण तुमच्यासारखे ब्राह्मणवादी युगात मी अशा दुष्ट मुलांचा जन्म नको आहे, म्हणून कृपया माझ्यावर दया करा. तेव्हा महर्षि विश्रवांनी कैकसीला सांगितले की तुमचा तिसरा मुलगा माझ्यासारखा धर्मात्मा असेल.”
काही दिवसांनी कैकसीने एका अत्यंत भयंकर आणि विभत्स राक्षस रुपी मुलाला जन्म दिला, ज्याचे दहा डोके होते. त्याचा शरीराचा रंग काळा होता आणि आकार डोंगरासारखा होता. म्हणूनच महर्षि विश्रवा यांनी कैकसीच्या जेष्ठ मुलाचं नाव दशग्रिव असे ठेवले. जो नंतर तिन्ही जगात रावण म्हणून प्रसिद्ध झाला. त्यानंतर कैकसीच्या गर्भाशयातून कुंभकरण जन्माला आला. त्याच्यासारखा दुसरा कोणी प्राणी नव्हता. त्यानंतर विद्रूप चेहऱ्याच्या सुर्पणखाचा जन्म झाला. त्यानंतर कैकसीचा सर्वात लहान मुलगा धर्मात्मा विभीषणचा जन्म झाला.
Ram Navami 2021 | रामनवमी का साजरी केली जाते? जाणून घ्या रामनवमीची तिथी, महत्त्व, शुभ मुहूर्त आणि कथा…https://t.co/CeqDJYfGWG#RamNavami2021 #LordRama
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 21, 2021
How The Ravana Was Born Know The Strange Story
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Ram Navami 2021 | या रामनवमीला 9 वर्षांनंतर पांच ग्रहांचा दुर्मिळ शुभ योगायोग
PHOTO | Ram Navami 2021 | आज रामनवमी, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा जन्मदिन