जर तुमच्यासोबतही वारंवार घडत असतील ‘या’ चार घटना तर वेळीच सावध व्हा; आहे खास दैवी संकेत, असते वादळापूर्वीची शांतता!

प्रत्येक व्यक्तीसोबत त्याच्या आयुष्यात कधीना कधी अशा घटना घडत असतात. मात्र सामन्या गोष्टी म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.

जर तुमच्यासोबतही वारंवार घडत असतील 'या' चार घटना तर वेळीच सावध व्हा; आहे खास दैवी संकेत, असते वादळापूर्वीची शांतता!
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 9:51 PM

प्रत्येक व्यक्तीसोबत त्याच्या आयुष्यात कधीना कधी अशा घटना घडत असतात. त्याला त्याच्या दैनंदिन आयुष्यात काही छोट्या-मोठ्या घटना घडताना दिसतात. जसं की, काच तुटणे, एखादी वस्तू हातातून खाली सांडणे, एखादा मेलेला प्राणी दिसणे. मात्र या घटना सामान्य आहेत म्हणून आपण सोडून देतो. परंतु ज्योतिष शास्त्रामध्ये या घटनांचं विश्लेषण करून शुभ-अशुभ संकेत सांगण्यात आले आहेत. त्याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत, तसेच त्याच्या प्रभावापासून वाचण्याचे उपाय देखील जाणून घेऊयात.

घरात कुंकू सांडणं

अनेकदा तुम्ही घरात काम करत असतात, आणि तुमच्या हातातून कुंकू खाली सांडतं. जेव्हा अशी घटना तुमच्यासोबत घडते तेव्हा तुमच्या मनात वेगवेगळे विचार येतात. मात्र ज्योतिष शास्त्रानुसार कुंकू सांडणं हे एक अशुभ लक्षण आहे. जर तुमच्यासोबतही अशी घटना घडली तर महिलांनी ते कुंकू आपल्या भांगेमध्ये भरावं, व एक कुंकवाची डबी भरून पिंपळाच्या वृक्षाखाली ठेवावी.

कांच तुटणे

अनेकदा असं होतं की तुम्ही कुठल्यातरी शुभ कामंसाठी घरातून बाहेर पडत असताल आणि अशावेळी जर एखादी काचेची वस्तू तुटली तर त्याला देखील ज्योतिष शास्त्रात अशुभ मानलं जातं. असं समजलं जात की तुम्ही ज्या कामासाठी बाहेर निघाला आहात त्यात अपयश येण्याची शक्यता आहे. अशावेळी तुम्ही याच्या प्रभावापासून वाचण्यासाठी महादेवाला एक पांढऱ्या रंगाचे फूल वाहावे आणि मगच घरातून बाहेर पडावं.

केसांच्या गुच्छाला ओलांडणं

घरात महिलांचे केस तुटून खाली पडणे ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र तुम्हाला जर रस्त्याने जाताना अनेक केसांचा एखादा गुच्छ दिसला तर त्याला चुकूनही ओलांडू नका. असं मानलं जात की त्यामुळे त्या व्यक्तीवरचं संकट तुमच्यावर येऊ शकतं.

घरात मेलेला उंदीर दिसणं

उंदीर हे गणपती बाप्पाचं वाहन आहे. घरात मेलेला उंदीर दिसणं हा एक अशुभ संकेत मानला जातो. त्यामुळे कधी तुमच्यासोबत असं घडलं तर याच्या प्रभावापासून वाचण्यासाठी गणपतीला एक फूल वाहावं असं ज्योतिष शास्त्र सांगतं.

( टीप ही माहिती केवळ सामान्य ज्ञानाच्या आधारे देण्यात आली आहे, अंधश्रद्धा पसरवण्याचा ही माहिती देण्यामागे कोणताही हेतू नाही)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.