Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच संकेत मिळाले तर समजून जा की लक्ष्मी आपल्या घरी येतंय, तेव्हा अशी चूक करू नका

देवी लक्ष्मीची ज्या भक्तांवर कृपा असते त्यांना कसलीच उणीव जाणवत नाही. ज्या कामात हात टाकतात त्या कामात अपेक्षित यश मिळतं. पण काही जणांना मेहनत करूनही यश मिळत नाही.

पाच संकेत मिळाले तर समजून जा की लक्ष्मी आपल्या घरी येतंय, तेव्हा अशी चूक करू नका
देवी लक्ष्मीच्या स्वागताला तयार राहा, अशी मिळते आगमनाची सूचना
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 7:36 PM

मुंबई : ग्रह ताऱ्यांसोबत देवी लक्ष्मीची कृपा असणंही गरजेचं आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात देवी लक्ष्मीबाबत बरंच काही सांगितलं गेलं आहे. जर देवी लक्ष्मीची तुमच्या कृपा असेल तर काहीच सांगायला नको. रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. पण कधी देवी लक्ष्मी आपल्या घरी सोन पावलाने आली आहे, याबाबत आपल्याला कळत नाही. तसेच आपल्याकडून नकळत काही चुका होतात आणि देवी लक्ष्मी घरातून निघून जाते. त्यामुळे देवी लक्ष्मीचा आपल्या घरात वास असल्याचे काही संकेत आहे. हे संकेत ओळखून वागणं ठेवल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की मिळतो.

देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी श्रद्धापूर्वक पूजन केलं पाहीजे. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार आहे. कारण देवी लक्ष्मीची कृपा ज्या भक्तांवर असते त्यांना पैशांची कधीच उणीव भासत नाही.

  • जर तुमच्या मेन गेटजवळ रुईचं झाड असेल तर समजून का की आपली चांगली वेळ सुरु झाली आहे. हे झाड तुमच्या भविष्यातील चांगल्या दिवसाचे संकेत देते.
  • जर तुमच्या घरासमोर सफेद गाय येऊन हंबरडा फोडू लागली तर ते देवी लक्ष्मीचा वास असल्याचे संकेत आहे. गायीला गुळ, रोटी भरवून तिचं स्वागत केलं पाहीजे.
  • घरातून बाहेर कामानिमित्त जात असताना वाटेत पाण्यानं भरलेला कलश दिसला तर समजून जा की तुम्हाला कामात यश मिळणार आहे. तुमच्या कामात निश्चित यश मिळेल याचे ते संकेत असतात.
  • तुमच्या अंगणात चिमण्यांचा चिवचिवाट सुरु झाला तर समजून का चांगले दिवस येणार आहेत. चिमण्यांसाठी पाणी आणि दाण्यांची व्यवस्था करा.
  • बाहेर फिरायला जाताना वाटेत पैसे मिळाले तर समजून जा की देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल याचे संकेत असतात.

शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावेत. त्यानंतर देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी. देवीला कमल पुष्प अर्पण करावं. देवी लक्ष्मी आणि शुक्र ग्रहाची कृपा प्रात्प व्हावी यासाठी मंत्राचा जाप करावा.

या देवि सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ या मंत्राचा चैत्र नवरात्रीत सलग 9 दिवस श्रद्धापूर्वक जप करावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.