Swapna Shastra : तुम्हाला स्वप्नात हे तीन पक्षी दिसले तर समजून जा प्रगतीचं दारं खुली झाली! जाणून घ्या स्वप्नशास्त्र

हिंदू धर्मात धार्मिक दृष्टीकोनातून बरीच शास्त्र सांगितली गेली आहेत. वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि बरंच काही.. यापैकी एक आहे स्वप्न शास्त्र.. अनेकदा आपल्याला स्वप्न पडतात. पण त्या स्वप्नांचा गूढ अर्थ कळत नाही. पण स्वप्नशास्त्रात त्याबाबत सांगितलं गेलं आहे.

Swapna Shastra : तुम्हाला स्वप्नात हे तीन पक्षी दिसले तर समजून जा प्रगतीचं दारं खुली झाली! जाणून घ्या स्वप्नशास्त्र
Follow us
| Updated on: Nov 21, 2024 | 10:07 PM

आपण जसा विचार करतो तसं घडत जातो असं आपल्याला लहानपणापासून माहिती आहे. त्यामुळे कायम सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. अन्यथा नकारात्मक विचारांमुळे आपल्यासोबतही नकारात्मक गोष्टी घडत जातात. अशावेळी कायम सकारात्मक विचार आणि संगती असलेली कधीही चांगली ठरते. त्यामुळे लहानपणापासूनच आईवडील चांगल्या संगतीच्या मित्रांसोबत राहा असा सल्ला देतात. दुसरीकडे, आपण विचार करतो तशी स्वप्न देखील पडतात. कारण त्या स्वप्नांवर आपल्या दैनंदिन जीवनाचा प्रभाव असतो. पण काही स्वप्न गूढ असतात. त्याचा नेमका अर्थ आपल्याला कळत नाही. आपण त्या स्वप्नांबाबत दिवसभर विचार करत राहतो. नेमकं असं माझ्यासोबत का घडलं असेल? असं तर मी कधीच वागलो नाही वगैरे.. स्वप्नशास्त्रानुसार हे सदर व्यक्तीला काही ना काही संदेश देत असतात. असंच काहीसं स्वप्नशास्त्रात सांगितलं गेलं आहे. स्वप्नात वारंवार साप दिसत असेल तर आपल्या पितृदोष असल्याचे संकेत मिळतात. दुसरीकडे, काही पक्षांचं स्वप्नात दिसणं चांगलं मानलं जातं. तीन पक्षांचं स्वप्नात दिसणं प्रगतीची दारं खुली होणार असल्याचे संकेत देतात.

स्वप्नशास्त्रानुसार, रात्री स्वप्नात घुबड दिसलं की लक्ष्मीची कृपा होणार असल्याचे संकेत असतात. कारण घुबड हे देवी लक्ष्मीची वाहन आहे. आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे असे संकेत या माध्यमातून मिळतात. देवी लक्ष्मी कृपा करणार असल्याने पहिल्यांदा आपल्याकडे वाहन पाठवते असं सांगितलं जातं. स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात मोर दिसणंही चांगले संकेत आहेत.स्वप्नात मोर दिसला की काहीतरी मोठं आणि चांगलं घडणार असल्याचे संकेत मिळतात. तसेच सुख समृद्धीची दारं खुली होणार असल्याचं कळतं.

स्वप्नात पोपट दिसणंही शुभ मानलं जातं. वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला परतावा मिळणार असल्याचे संकेत यातून मिळतात. त्यामुळे या तीन पक्षांचं स्वप्नात दिसणं शुभ मानलं जातं. पण अशी स्वप्न कोणासोबतही शेअर करू नयेत. आपल्याला संकेत मिळाल्यानंतर त्या दिशेने काम सुरु करणं महत्त्वाचं आहे. आपल्याला त्या कामातून यश मिळेल आणि आर्थिक मार्गही खुली होतील, असं स्वप्नशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.