Importance of Aarti: अशी सुरु झाली देवाची आरती करण्याची प्रथा; रंजक माहिती आणि महत्त्व
शास्त्रानुसार आरती म्हणजे पूर्ण भक्तिभावाने भगवंताच्या भक्तीत तल्लीन होणे.
स्कंद पुराणाच्या (Skand Puran) मते जर एखाद्याला मंत्र किंवा पूजेची पद्धत माहित नसेल पण भगवंताची आरती केली, किंवा त्यामध्ये सहभाग घेतला तरी त्याला संपूर्ण पूजा केल्याचं पुण्य मिळतं (Importance of aarti) . देवाप्रती त्याची सेवा स्वीकार होते. देवाची आरती झाल्यानंतर लोकं दोन्ही हातांनी आरती घेत असल्याचे असल्याचे आपण पाहतो. इतकेच काय तर एका हाताने आरती घेतल्यास घरातले मोठे लोकं टोकतातसुद्धा. बऱ्याचदा यामागचे कारण त्यांनाही माहिती नसते. यामागे एक शास्त्रीय कारण आहे. देवाची आरती केल्यानंतर एक सकारात्मक ऊर्जा उपस्थित असलेल्या लोकांमधून निर्माण होते. या ऊर्जेचा केंद्रबिंदू आरतीची ज्योत असते. अशावेळी दोन्ही हाताने आरती घेतल्यास जास्त प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते. म्हणून आरती घेतल्यानंतर दोन्ही हात चेहऱ्याला आणि डोक्याला लावण्याची पद्धत आहे.
आरतीचा अर्थ काय आहे? (Meaning of Aarti)
शास्त्रानुसार आरती म्हणजे पूर्ण भक्तिभावाने भगवंताच्या भक्तीत तल्लीन होणे. आरतीला नीरजन असेही म्हणतात. निरजन म्हणजे देवाप्रती आपली भक्ती अर्पण करणे.
आरतीचे महत्व (Importance of Arti)
स्कंद पुराणानुसार, भगवान विष्णूने सांगितले आहे की, जो मनुष्य तुपाचा दिवा लावून आरती करतो, तो अनेक वर्षे स्वर्गात राहतो . जो मनुष्य आरतीत सहभागी होतो त्याला परमधामाची प्राप्ती होते.
कशी असावी आरतीची थाळी?
आरतीसाठी तांबे, पितळ किंवा चांदीचे ताट वापरावे. स्टीलची थाळी किंवा स्टीलचा दिवा वापरू नये. आरती करण्यासाठी पितळेचा किंवा चांदीचा दिवा वापरावा, जर तो नसेल तर मातीचा किंवा पिठाचा दिवा वापरावा. आरतीच्या ताटात कापूर, कुंकू, अक्षत, फुले आणि दिवा व्यवस्थित ठेवावा.
आरती करण्याची योग्य पद्धत
आरती करताना दिवा फिरवण्याची योग्य पद्धत बहुतेकांना माहीत नसते. आरतीचे ताट हे डावीकडून उजवीकडे ओवाळावे. उजवीकडून डावीकडे कधीच ओवाळू नये. तेलाच्या दिव्याने आरती करू नये. आरती प्रथम परमेश्वराच्या चरणाला ओवाळावी त्यानंतर नाभीला आणि शेवटी मुखाला ओवाळावी. कापूर आरती करताना संपूर्ण मूर्तीला आरती ओवाळावी. आरती झाल्यानंतर ती जमिनीवर ठेऊ नये.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट द्वारे सांगा. पोस्टला लाईक करा आणि इतरांनाही पाठवा.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)