Gadchiroli Bappa : गडचिरोलीत महिलेनं चितारला इको फ्रेंडली बाप्पा, कौटुंबिक गणपतीच्या माध्यमातून पोलिसांचा संदेश लोकांपर्यंत, दादा लोरा खिडकीची जनजागृती
इको फ्रेंडली गणपती तयार करण्यासाठी अश्विनी सदाशिव देशमुख या महिलेनी 15 ते 20 दिवस कष्ट घेतले. इको फ्रेंडली गणपती उभारला. गडचिरोली जिल्हा डोंगराळ व जंगल क्षेत्रात येतो.
गडचिरोली : बाप्पा (Ganpati) सर्वांचेच आहेत. ते मुंबईले जसे आहेत तसे ते गडचिरोतील जंगलातीलही (Jungle) आहेत. बाप्पानं पोलिसांच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत द्यावी, असा प्रयत्न गडचिरोलीतील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीनं केलाय. तेही बाप्पाची स्थापना करून. बाप्पासमोर आदिवासींचं चित्र रेखाटलं. त्यांची जीवनशैली सांगितली. त्यातही त्या थांबल्या नाहीत. तर आदिवासींची (Tribal) पारंपरिक घरं या बाप्पासमोर चित्रीत केली आहेत.
आदिवासींची पारंपरिक घरे
इको फ्रेंडली गणपती तयार करण्यासाठी अश्विनी सदाशिव देशमुख या महिलेनी 15 ते 20 दिवस कष्ट घेतले. इको फ्रेंडली गणपती उभारला. गडचिरोली जिल्हा डोंगराळ व जंगल क्षेत्रात येतो. त्यामुळे या गणपतीच्या आजूबाजूला डोंगराळ भाग व मागासलेला क्षेत्र आहे. या गणपतीच्या समोर आदिवासींची पारंपरिक घरे व आदिवासी यांचे जीवनावश्यक वस्तूही दाखविण्यात आल्यात.
तीन लाख नागरिकांना फायदा
गणरायासमोर एक नक्षलवादी आणि तीन नागरिक वेगवेगळ्या वेशभूषेत दर्शविण्यात आलेत. दादा लोरा खिडकीच्या माध्यमानी गडचिरोली पोलिसांनी आतापर्यंत जवळपास तीन लाख नागरिकांचे वेगवेगळ्या योजनेतून फायदा मिळालेला आहे. हा उपक्रम गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील बारा तालुक्यातही राबविण्यात येत आहे. ही प्रतिकृती गणरायाच्या माध्यमाने पोलीस कुंटुबातील महिलांनी दर्शविली.
नक्षलवाद संपुष्ठात आणण्याचा उद्देश
गडचिरोली पोलीस कुटुंबातील एका महिलेनं इको फ्रेंडली गणपती तयार केला. गणपतीच्या आजूबाजूलाही गडचिरोलीसारखे डोंगराळ भाग दाखविलाय. जिल्ह्याचे आदिवासी जंगलातील नक्षल व नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. नक्षलवाद संपविण्यासाठी पोलिसाचा सुरू असलेले उपक्रम या माध्यमातून रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. गडचिरोलीत घरगुती गणरायानं एक चांगला संदेश दिला. एका पोलीस कुटुंबातील गृहिणीने हा इको फ्रेंडली गणपती तयार केला. दादा लोरा खिडकीच्या माध्यमाने नक्षलवाद संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस योजना राबवीत आहेत. या इको फ्रेंडली गणपतीच्या माध्यमाने दर्शविण्यात आलाय.