Rama Navami 2023 : राज्यभरात राम नवमी उत्साहात, भक्तिमय वातावरणात प्रभू श्रीरामाचा जय जयकार

पुण्याच्या भोरमधील ऐतिहासिक पंतसचिव राजवाड्यात, रामजन्म सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. रामनामाच्या जयघोषात, फुलांची उधळण करत आणि हजारो रामभक्तांच्या आलोट गर्दीत हा रामजन्म सोहळा पार पडला.

Rama Navami 2023 : राज्यभरात राम नवमी उत्साहात, भक्तिमय वातावरणात प्रभू श्रीरामाचा जय जयकार
Devendra Fadnavis Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 2:55 PM

महाराष्ट्र : परभणी (Parbhani) जिल्ह्यातील पूर्णा येथे श्रीराम नवमी (Ram Navami 2023) निमित्त शहरातील मुख्य रस्त्यावरून प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचे भव्य शोभायात्रा (big rally) काढण्यात आली. यावेळी विविध देखावे व श्रीराम यांची पालखी काढण्यात आली. श्री हनुमान यांच्या वेशात व लहान मुलांनी ही श्रीराम श्री हनुमान यांच्या वेशभूषात शोभायात्रेत सहभागी झाले होती. असंख्य राम भक्तांनी भव्य शोभायात्रेत सहभाग घेतला. एकूणच श्री श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. श्री हनुमान यांची वेशभूषा लक्षवेधी ठरली.

300 वर्षापेक्षा जास्तची वैभवशाली परंपरा

पुण्याच्या भोरमधील ऐतिहासिक पंतसचिव राजवाड्यात, रामजन्म सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. रामनामाच्या जयघोषात, फुलांची उधळण करत आणि हजारो रामभक्तांच्या आलोट गर्दीत हा रामजन्म सोहळा पार पडला. ह्या राम जन्मोत्सवाला सुमारे 300 वर्षापेक्षा जास्तची वैभवशाली परंपरा लाभली आहे. भोर संस्थांनच्या पंतसचिव राज्यांचे वंशज, राजेश राजे पंतसचिव यांच्या हस्ते हा जन्मोउत्सव सोहळा पार पडला.

नाशिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा

चैत्र शुद्ध नवमी असल्याने लासलगाव येथे राम मंदिरात रामजन्म उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला, राम मंदिरातून चैत्र शुध्द प्रतिपदेपासून रामनवमीपर्यंत असा नऊ दिवस हा उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी अकराच्या सुमारास रामजन्माचे कीर्तन संपन्न होऊन दुपारी १२ वा सर्व भाविकानी राममृती वर फुले, गुलाला उधळून , टाळ मृदुंगाच्या गजरात रामनामाचा जयजयकार ,फटके आतषबाजी करण्यात आली. यानंतर आरती करून महिलांनी श्रीरामाचा पाळणा म्हटला उत्सवानिमित्त परिसरातील भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी रामनवमी उत्सवासाठी विश्वस्त, पुजारी व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

भक्तिमय वातावरणात प्रभू श्रीरामाचा जय जयकार

अहमदनगरला राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे, शहरातील नव्या बाजारपेठेतील पुरातन श्रीराम मंदिरात श्रीरामभक्त हनुमान सत्संग मंडळाच्या वतिने रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. सकाळी प्रभुरामचंद्राचा जल आणि दुग्धाभिषेक करण्यात आलाय. तसेच मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दुपारी ठिक १२ वा १० मीनिटांनी श्रीराम जन्म झाला. त्यानंतर महाआरती करण्यात आली. भक्तिमय वातावरणात प्रभू श्रीरामाचा जय जयकार करण्यात आला. तसेच यावेळी भजनांचा कार्यक्रम पार पडला. या भजनांच्या तालावर भाविक तल्लीन होऊन ठेका धरला होता. यावेळी आरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

रामनवमीच्या निमित्ताने परळी शहरातील पुरातन सावळाराम, काळाराम व गोराराम मंदिरात सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून आली. मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. दुपारी 12 वाजता पारंपरिक पद्धतीने फुले व गुलाल उधळून पाळणा गाऊन भजन करत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.