Indira Ekadashi 2023 : पितरांसाठी महत्त्वाची मनली जाते इंदिरा एकादशी, पूजा विधी आणि महत्त्व

ज्या व्यक्तीचा आत्मा यमलोक किंवा पितृलोकात अडकला असेल त्याच्या मोक्षासाठी इंदिरा एकादशीचे व्रत (Indira Ekadashi 2023) केले जाते. इंदिरा एकादशीच्या व्रताचे महत्त्व युधिष्ठिराला सांगताना भगवान श्रीकृष्णांनी सांगितले होते की, इंदिरा एकादशीच्या व्रताने पितरांना अधोगतीपासून मुक्ती मिळते.

Indira Ekadashi 2023 : पितरांसाठी महत्त्वाची मनली जाते इंदिरा एकादशी, पूजा विधी आणि महत्त्व
एकादशीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 10:36 AM

मुंबई : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला इंदिरा एकादशी व्रत केले जाते. भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्ष पितृ पक्ष म्हणून ओळखला जातो आणि यामध्ये पितरांसाठी श्राद्ध, तर्पण इत्यादी केले जातात. ज्या व्यक्तीचा आत्मा यमलोक किंवा पितृलोकात अडकला असेल त्याच्या मोक्षासाठी इंदिरा एकादशीचे व्रत (Indira Ekadashi 2023) केले जाते. इंदिरा एकादशीच्या व्रताचे महत्त्व युधिष्ठिराला सांगताना भगवान श्रीकृष्णांनी सांगितले होते की, इंदिरा एकादशीच्या व्रताने पितरांना अधोगतीपासून मुक्ती मिळते. हे व्रत केल्याने मनुष्य पापमुक्त होतो. त्याला भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो आणि त्याला वैकुंठामध्ये स्थान मिळते.  इंदिरा एकादशीचे व्रत कधी असते? इंदिरा एकादशी व्रताची उपासना पद्धत, मुहूर्त आणि पारण वेळ काय आहे? याबद्दल जाणून घेऊया

इंदिरा एकादशी 2023 कधी आहे?

पंचांगानुसार, यावर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी सोमवार, 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:36 वाजता सुरू होईल. ही तारीख मंगळवार, 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 03:08 वाजता संपेल. अशा स्थितीत उदयतिथीच्या मान्यतेनुसार मंगळवार, 10 ऑक्टोबर रोजी इंदिरा एकादशीचे व्रत केले जाणार आहे.

साध्या आणि शुभ योगात इंदिरा एकादशीचे व्रत

यंदाची इंदिरा एकादशी साध्या आणि शुभ योगात आहे. उपवासाच्या दिवशी सकाळपासून सकाळी 7.47 वाजेपर्यंत साध्य योग असतो. त्यानंतर शुभ योग सुरू होईल, जो दिवसभर राहील. या दोन्ही गोष्टी शुभ कार्य आणि उपासनेसाठी चांगल्या मानल्या जातात.

हे सुद्धा वाचा

इंदिरा एकादशी 2023 पूजेचा मुहूर्त काय आहे?

इंदिरा एकादशीच्या दिवशी तुम्ही पहाटेपासूनच भगवान विष्णूची पूजा करू शकता. याशिवाय, तुमची इच्छा असल्यास, तुम्ही सकाळी 09:13 ते दुपारी 01:35 दरम्यान कधीही इंदिरा एकादशीचे व्रत करू शकता. यामध्ये लाभ-उन्नती मुहूर्त सकाळी 10:41 ते दुपारी 12:08 पर्यंत आहे, तर अमृत-सर्वोत्तम मुहूर्त 12:08 ते दुपारी 01:35 पर्यंत आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.