सूर्यग्रहण राजकीय उलथा पालथ निर्माण करणारे; वाईट परिणाम भोगावच लागणार; ज्योतिष्यांचा इशारा
राजकीय मंडळींंवर ग्रहणाचा नेमका काय परिणाम होणार?
औरंगाबाद : भारतासह संपूर्ण जगामध्ये खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. या सूर्यग्रहणाचे काही परिणाम आहेत तर काही दुष्परिणाम सुद्धा आहेत. काही राशीच्या लोकांना हे ग्रहण अशुभ ठरमार आहे. तर, काही राशीच्या लोकांना हे ग्रहण शुभ ठरणार आहे. यामुळे राजकारणी मंडळींवर देखील या ग्रहणाचा परिणाम होणार आहे. हे सूर्यग्रहण राजकीय उलथा पालथी निर्माण करणारे ठरणार आहे. यामुळे वाईट परिणाम भोगावच लागणार असा इशारा औरंगाबादचे सुप्रसिद्ध ज्योतिषी कृष्णकांत मुळे गुरुजी यांनी दिला आहे.
अश्विन कृष्ण अमावस्या 25 ऑक्टोबर 2022 मंगळवार या दिवशी हे ग्रहण दिसणार आहे. ग्रहणाचा वेदाधिकार प्रातःकाळ म्हणजे सुतक 12 तास अगोदर सुरू होते.
कोणत्याही ग्रहणाचे शुभ, अशुभ आणि मिश्र असे तीन प्रकारचं फल आपल्याला प्राप्त होतात असे कृष्णकांत मुळे गुरुजी यांनी सांगितले.
मकर, मिथुन, कन्या, कुंभ या राशींवर शुभ किंवा अशुभ फल असा कुठलाही परिणाम होणार नाही. कर्क, तुला, वृश्चिक आणि मिन राशींसाठी ग्रहण अशुभ ठरणार आहे. तर, वृषभ, सिंह, धनु, मकर राशीसाठी हे ग्रहण फलदायी ठरणार आहे.
कोणत्याही व्यक्तीचे नाव घेता येणार नाही. मात्र, राशीनुसार राजकीय व्यक्तींच्या आयुष्यातही या ग्रहणाचा परिणाम होणार आहे. यामुळे वाईट परिणाम भोगावच लागणार असे कृष्णकांत मुळे गुरुजी म्हणाले.