पंतप्रधान मोदी यांना नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देण्याचे निमंत्रण

अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठापणा पार पडणार आहे. त्याआधी पंतप्रधान नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. या आधी मोदी नाशिक दौऱ्यावर आलेत मात्र काळारामचे दर्शन घेण्याचा त्यांचा योग आला नाही. त्यामुळे 12 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी पुन्हा नाशिकमधे येणार आहेत त्या दिवशी त्यांनी काळारामचे दर्शन घेण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.  

पंतप्रधान मोदी यांना नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देण्याचे निमंत्रण
काळाराम मंदिर
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 7:43 PM

नाशिक : सध्या सर्वत्र राम मंदिराच्या (Ram Mandir) लोकार्पणाची चर्चा आहे. 22 जानेवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठापणा पार पडणार आहे. त्याआधी पंतप्रधान नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. नाशिक शहराला प्राचिन हिंदू सभ्यतेचा वारसा लाभलेला आहे. वनवास काळात प्रभू रामानेही नाशिकपरिसरात असलेल्या वनात वास्तव्य केले होते. हा भाग पंचवटी नावाने प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये काळा राम नावाचे प्राचीन राम मंदिर आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्याचा निर्णय मंदिर ट्रस्टने घेतला आहे.  काळाराम देवस्थानाचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी ही माहिती दिली आहे.

दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य असल्याचे पुराणात दाखले आहे. त्यामुळे श्रीरामांच्या वास्तव्याने ही भूमी पावन झाली आहे. श्रीरामाची पदचिन्हे अनेक मंदिरांच्या रूपाने आजही नाशिकमध्ये दिसतात. नाशिकचे श्री काळाराम मंदिर प्रमुख मंदिर मानले जाते. प्रभू रामचंद्र वनवासात असताना पंचवटीत आल्यानंतर जेथे त्यांनी वास केला होता. त्यामुळे या मंदिराला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. अयोध्येतील राम मंदीर लोकार्पण सोहळ्या आधी मोदींनी अतिप्राचीन काळारामचे दर्शन घेण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. या आधी मोदी नाशिक दौऱ्यावर आलेत मात्र काळारामचे दर्शन घेण्याचा त्यांचा योग आला नाही. त्यामुळे 12 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी पुन्हा नाशिकमधे येणार आहेत त्या दिवशी त्यांनी काळारामचे दर्शन घेण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

या कारणासाठी मंदिर आहे प्रसिद्ध

साधारण काही वर्षांपूर्वी या परिसरात नागपंथीय साधू वास्तव्यास होते. मंदिरालगत भैरवनाथ व गोरक्षनाथांचे मंदिरही आहे. काही नागपंथी साधूंना अरूणा-वरूणा नद्यांच्या संगमावर या मूर्ती सापडल्या. त्यांनी लाकडी मंदिर बांधले. पुढे 1780 मध्ये माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी सरदार रंगराव ओढेकरांना हे मंदिर बांधण्याची सूचना केली. 1790 मध्ये मंदिर बांधून पूर्ण झाले. त्याकाळी या बांधकामासाठी 23 लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितल्या जाते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.