कल्याणमधील लेखिका मंजिरी फडके यांना अयोध्येतील सोहळ्याचे निमंत्रण, कोण आहेत या लेखिका?
मंजिरी यांचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून संघाचे काम करीत आहेत. पुणे येथे 35 वर्षे अध्यापन क्षेत्रात त्यांनी काम केले. शैक्षणिक संस्थेवर संचालिका म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. 2013 ला त्या कुटुंबासह कल्याण येथे रहायला आल्या.
मुंबई : अयोध्येत येत्या 22 जानेवारी रोजी राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. याचे निमंत्रण मान्यवरांना प्राप्त होणे सुरू होणार आहे. या सोहळ्याचे निमंत्रण कल्याण येथील एक सेवानिवृत्त शिक्षिक आणि लेखिका मंजिरी मधुकर फडके (Manjiri Fadke) यांना श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे देण्यात आले आहे. देशाच्या विविध भागातील मोजक्या निमंत्रितांना या सोहळ्यासाठी आयोजकांकडून निमंत्रित केले जात आहे. या सोहळ्यासाठी कल्याणमधील एका शिक्षिकेला निमंत्रित करण्यात आल्याने शहरात आनंदाचे वातावरण आहे.
कोण आहेत या लेखिका?
मंजिरी यांचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून संघाचे काम करीत आहेत. पुणे येथे 35 वर्षे अध्यापन क्षेत्रात त्यांनी काम केले. शैक्षणिक संस्थेवर संचालिका म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. 2013 ला त्या कुटुंबासह कल्याण येथे रहायला आल्या. श्री गुरुकुलम न्यास संस्थेची स्थापना त्यांनी 2013 साली केली. ठाणे, रायगड, नाशिक आणि पालघर या चार जिल्ह्यात 40 शिक्षकांच्या मदतीने ही संस्था कार्यरत आहे. भागवत गीता व वैदिक वाड्मय याचे शिक्षण यामार्फत दिले जाते. तसेच गेले 50 वर्षे त्या संघाच्या कार्यात आपली सेवा देत आहेत.याच कामाचे फलित म्हणून आज हे निमंत्रण आल्याची भावना मंजिरी यांनी व्यक्त केली आहे .
कारसेवा पुरममधील मैदानावर उभारले टेंट
22 जानेवारीला अयोध्येत रामललाच्या प्राणप्तिष्ठापणेचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला हजारो मान्यवरांना निमंत्रीत करण्यात आले आहे. या मध्ये चित्रपटसृष्टीतले कलाकार, राजकिय नेते, क्रिड क्षेत्रात योगदान दिलेले अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आममंत्रित करण्यात आले आहे. या निमंत्रितांची राहाण्याची सोय करण्यासाठी टेंट सिटी उभारण्यात आली आहे. कारसेवा पुरममधील मैदानावर टेंट उभारण्यात आले आहे. यामध्ये 4 हजार साधूंची व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय 8 हजार इतर लोकांची व्यवस्था केली जाणार आहे. टेंटमध्ये बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. व्हीआयपी लोकांसाठी वेगळी व्यवस्था असणार आहे.