देवघरात ‘या’ 5 गोष्टी ठेवणं अशुभ मानलं जातं, तुमच्या देवघरात या गोष्टी असतील तर आजच काढून टाका
घरातील देवघरात या गोष्टी ठेवणं अशुभ मानलं जातं. तुमच्या देवघरात ही या गोष्टी असतील तर ताबडतोब या गोष्टी ठेवणं बंद करा.
हिंदू धर्मात (Hindu Dharma) देव पूजा करण्याच्या काही पद्धती सांगितल्या गेल्या आहेत. (Rules of worship) हे नियम पाळलेच गेले पाहिजेत. तरंच तुमची पूजा सफळसंपूर्ण होते असं मानलं जातं. इथे जाणून घेऊया याच गोष्टींबद्दल ज्या पुजेत केल्या नाही पाहिजेत. ज्यागोष्टी देवघरात ठेवणं अशुभ मानलं जातं.
प्रत्येकाच्या घरात एक देवघर असतेच. यादेवघरात सर्व देव देवतांचे फोटो ठेवलेले असतात. घरातील सर्व सदस्य या फोटोची पूजा करतात. पण, हिंदू धर्मात पूजेशी निगडीत सर्व नियमांबद्दल सांगितलं गेलं आहे. यानियमाचं पालन केलं पाहिजे. देवघरात देवपूजा करताना या सहा गोष्टी अजिबात ठेवू नये. यागोष्टी ठेवल्या तर देव कोपतो असं मानलं जातं. तुमच्या घरी ही देवघर असेल तर वाचाच. कदाचित चुकून तुम्ही ही चुक करत तर नाही आहात ना. तुमच्या देवघरात असं काही असेल तर लगेच काढून टाका.
पूजे दरम्यान करू नका या चुका
- घरातील मंदिरात कोणत्याच देवाच्या एका पेक्षा जास्त मुर्त्या ठेवू नका. जर ठेवल्या असतील तर याची काळजी घ्या की याची संख्या 3,5,7 नसेल.
- -घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका. देवघरात लोक शिवलिंग ठेवतात. शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहेत. घरात एका पेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नये असं शिवपुराणात सांगितलं गेलं आहे. शिवलिंगातून प्रत्येकवेळी ऊर्जेचा संचार होत असतो. त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागी ठेवावे. त्याचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा मोठा नसावा.
- देवघरात कोणत्याच देवाचा रौद्ररूपातील फोटू ठेवू नका. नेहमी देवाचे हसणारे, प्रसन्न चेहरे असणारे फोटो ठेवावे. क्रोधातील फोटो ठेवणं अशुभ मानलं जातं. हसणारे फोटो शुभ मानले जातात. ते घरात सकारात्मकता आणतात.
- कोणत्याच देवाची तुटलेली मुर्ती किंवा फोटो घरात ठेवू नका. तुटलेली मुर्ती किंवा फोटो घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. त्याने वास्तु दोष उत्पन्न होतात. तुटलेली मुर्ती किंवा फोटो घरात असेल तर तो आजच काढून टाका.
- -पूजे दरम्यान तांदूळाला अत्यंत महत्वपूर्ण मानलं गेलं आहे. तांदळाला शुद्ध धान्य मानलं जातं. ते पूजेत फुलांची कमी पूर्ण करतात. पण देवावर कधीच टूटलेले तांदूळ टाकू नये. त्याला अशुभ मानलं जातं. जर तुमच्या घरातील देवघरात तुटलेले तांदुळ आसतील, तर आज चे काढून त्याजागी चांगले अख्खे तांदुळ ठेवा.
(दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे. याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही.)