Mahasthami 2023 : आज महाअष्टमीला कन्या पूजन करण्याआधी हे नियम अवश्य वाचा, असे आहे महत्त्व
अष्टमी तिथीला देवी स्वरूपा मुलींना बोलावून त्यांची पूजा करायची असेल तर त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. चला जाणून घेऊया नवरात्रीमध्ये कन्या पूजन करण्याच्या त्या महत्त्वाच्या नियमांबद्दल. 9 मुलीसोबत एक किंवा दोन मुलांना बोलावण्याचाही नियम आहे. हिंदू मान्यतेनुसार, ही दोन मुलं गणपती आणि भगवान भैरवाचे प्रतीक आहेत. मुलींनी घरात प्रवेश केल्यानंतर त्यांचे पाय धुतले पाहिजेत.
मुंबई : नवरात्रीच्या (Navratri 2023) पवित्र सणात 2 ते 10 वर्षांच्या मुलींना देवी मानून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. काही जण या मुलींना देवी दुर्गेचे रूप मानतात आणि त्यांची दररोज पूजा करतात तर काही त्यांना अष्टमी किंवा नवमी तिथीला एकत्र बोलावतात. अष्टमी तिथीला देवी स्वरूपा मुलींना बोलावून त्यांची पूजा करायची असेल तर त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. चला जाणून घेऊया नवरात्रीमध्ये कन्या पूजन करण्याच्या त्या महत्त्वाच्या नियमांबद्दल, ज्याचे पालन केल्याने इच्छित आशीर्वाद मिळतात आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास नवरात्रीचे व्रत अपूर्ण राहते.
कन्या पूजेत काय करावे?
- कन्या पूजा करण्यासाठी सर्व प्रथम 9 मुलींना मोठ्या आदराने आपल्या घरी बोलावावे
- कन्या पूजेमध्ये 9 मुलींना 9 देवींचे रूप मानले जाते, त्यामुळे कन्या पूजेसाठी फक्त 9 मुलींना बोलवा. जर तुम्हाला 9 मुली एकत्र न मिळाल्यास
- आलेल्या सर्व मुलींची पूजा करा आणि उरलेल्या मुलींना भेटवस्तू आणि प्रसाद द्या
- 9 मुलीसोबत एक किंवा दोन मुलांना बोलावण्याचाही नियम आहे. हिंदू मान्यतेनुसार, ही दोन मुलं गणपती आणि भगवान भैरवाचे प्रतीक आहेत. मुलींनी घरात प्रवेश केल्यानंतर त्यांचे पाय धुतले पाहिजेत. जर तुम्ही उपवास आणि उपासना करत असाल तर पुण्य मिळविण्यासाठी स्वत: पाय धुवावे
- मुलींचे पाय धुतल्यानंतर त्यांना हळद कुंकू लावावे, पायावर फुले वाहावी आणि औक्षवण करावे.
- कन्यांना कपडे किंवा भेटवस्तू द्यावी.
कन्या पूजेत काय करू नये
- मुलींसाठी स्वादिष्ठ आणि कमी तिखटाचे अन्न बनवावे. त्यांच्यावर खाण्यासाठी दबाव टाकू नका.
- घरी आलेल्या मुलींशी अतिशय आदराने वागा, त्या प्रसन्न झाल्यास तुम्हाला देवीचा आशिर्वाद आपोआपच प्राप्त होतो
- तुमच्या घरी आलेल्या 9 मुलींना भेटवस्तू अवश्य द्या.
- मुलींना शिळे अन्न खाऊ घालू नका. त्यांना फक्त ताजे तयार केलेले अन्नच खायला द्यावे.
- मुलीसाठी तयार केलेल्या जेवणात लसूण, कांदा वगैरे घालू नये.
- कन्या पूजा केल्यानंतर आदराने निरोप द्या. तसेच पुढच्या वर्षी येणयासाठी निरोप द्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)