Jaganaath Puri : जगन्नथ पूरीचे पाच मोठे रहस्य, विज्ञानालाही देत आहे आव्हान!

सनातन परंपरेत जगन्नाथ मंदिर हे वैष्णव परंपरेतील सर्वात मोठे तीर्थस्थान मानले जाते. भगवान जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातील हजारो भाविक दररोज या श्रद्धास्थानाला भेट देतात.

Jaganaath Puri : जगन्नथ पूरीचे पाच मोठे रहस्य, विज्ञानालाही देत आहे आव्हान!
जगन्नाथ धामImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 11:45 AM

मुंबई : ओडिशामध्ये स्थित जगन्नाथ मंदिर (Jagannath Puri Temple) हे भगवान विष्णू, श्री कृष्णाचे पृथ्वीवरचे वैकुंठ रूप मानले जाते. असे म्हणतात की पुरीचे हे पौराणिक मंदिर अति प्राचिन आहे. या मंदिराशी निगडित इतिहास खूपच थक्क करणारा आहे. जगन्नाथ मंदिरातील मूर्तींमध्ये आजही श्रीकृष्णाचे हृदय धडधडते अशी धार्मिक धारणा आहे. सनातन परंपरेत जगन्नाथ मंदिर हे वैष्णव परंपरेतील सर्वात मोठे तीर्थस्थान मानले जाते. भगवान जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातील हजारो भाविक दररोज या श्रद्धास्थानाला भेट देतात. पुरीचे हे मंदिर भगवान कृष्णाला समर्पित आहे, पण तिथे त्याला जगन्नाथ धाम म्हणून ओळखले जाते. पुरीच्या या मंदिरात, हिंदू धर्माशी संबंधित चार प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक, भगवान जगन्नाथ आणि त्यांचा मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या मूर्ती दिसतात.

जगन्नाथ धामचे हे रहस्य आहेत थक्क करणारे

  1. असे मानले जाते की जगन्नाथ मंदिरात प्रसाद शिजवण्यासाठी 7 भांडी एकावर एक ठेवली जातात, ज्यामध्ये सर्वात वरच्या भांड्यातला प्रसाद आधी शिजतो, तर वरून खाली अशा क्रमाने एकामागून एक प्रसाद शिजत जातो. हे एक आश्चर्यच आहे.
  2. मंदिरात दिवसा समुद्राकडून जमिनीवर वारा वाहत असल्याचे मानले जाते. संध्याकाळी वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात. जगन्नाथ मंदिराच्या शिखरावरील ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरूद्ध दिशेला फडकतो.
  3. जगन्नाथ मंदिराची उंची सुमारे 214 फूट असल्याचे मानले जाते. अशा स्थितीत पशू-पक्ष्यांची सावली निर्माण होते मात्र या मंदिराच्या शिखराची सावली कायमच गायब राहते.
  4. पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर कधीही विमान उडत नाही किंवा मंदिराच्या शिखरावर पक्षी बसत नाही. हे भारतातील कोणत्याही मंदिरात पाहिले गेले नाही.
  5. मंदिरात दर 12 वर्षांनी जगन्नाथासह तिन्ही मूर्ती बदलल्या जातात. त्यानंतर तेथे नवीन मूर्ती बसवल्या जातात. देवाच्या मूर्ती बदलताना शहराची वीज खंडित केली जाते. यासोबतच मंदिराबाहेर प्रचंड सुरक्षा दल तैनात करण्यात येते. त्या काळात मंदिरात फक्त पुजारीच प्रवेश करू शकततात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....