या तारखेला सुरू होणार जग्गनाथ रथ यात्रा, जगभरात या कारणांमुळे प्रसिद्ध आहे ही यात्रा
पुरी रथयात्रेसाठी बलराम, श्रीकृष्ण आणि देवी सुभद्रा यांचे तीन वेगवेगळे रथ बनवले जातात. रथयात्रेत बलरामजींचा रथ समोर असतो, नंतर देवी सुभद्राचा रथ मध्यभागी असतो आणि भगवान जगन्नाथ श्रीकृष्णाचा रथ मागे असतो. हे त्यांच्या रंग आणि उंचीवरून ओळखले जाते.
मुंबई : जगन्नाथ रथयात्रेला (Jagannath Rathyatra 2023) हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या यात्रेला रथ महोत्सव म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी पुरी शहरात भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा काढली जाते आणि त्यात देश-विदेशातील लाखो लोकं सहभागी होतात. रथयात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती जगन्नाथ मंदिरातून बाहेर काढल्या जातात आणि तीन मोठ्या रथांवर ठेवल्या जातात.
अशी आहेत जगन्नाथ रथयात्रेच्या 3 रथांची नावे
नंदीघोष (भगवान जगन्नाथासाठी), तलध्वज (बलभद्रासाठी) आणि दर्पदालन (सुभद्रासाठी) म्हणून ओळखले जाणारे हे रथ सुंदरपणे सजवलेले आहेत आणि रथयात्रेसाठी भक्तांनी पुरीच्या रस्त्यावरून खेचले आहेत. रथयात्रा सुमारे 3 किलोमीटर अंतर कापते आणि गुंडीचा मंदिरात समाप्त होते, जिथे भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा 9 दिवस राहतात.
जगन्नाथ रथयात्रा दरवर्षी कधी सुरू होते?
दरवर्षी आषाढ महिन्यात (जून-जुलै) शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला रथयात्रा काढली जाते. जगन्नाथ रथयात्रेच्या रथाची उंची सुमारे 45 फूट असून या रथाचे नाव नंदीघोष आहे, तर भगवान बलभद्र यांचा रथ 14 चाके असलेला 45.6 फूट उंच असून त्याचे नाव तलध्वज आहे. माता सुभद्राच्या रथाचे नाव देवदालन असे असून त्याला 12 चाके असून हा रथही सुमारे 44.6 फूट उंच आहे.
ही रथयात्रा कधी सुरू होणार
यावर्षी जगन्नाथ रथयात्रा 2023 20 जून रोजी दुपारी 22:04 वाजता सुरू होईल आणि रथयात्रा 21 जून रोजी रात्री 19:09 वाजता संपेल. रथयात्रेत सहभागी होणार्या भाविकांना शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळतात, अशी पौराणिक धारणा आहे.
यात्रेचे वैशिष्ट्ये
1. पुरी रथयात्रेसाठी बलराम, श्रीकृष्ण आणि देवी सुभद्रा यांचे तीन वेगवेगळे रथ बनवले जातात. रथयात्रेत बलरामजींचा रथ समोर असतो, नंतर देवी सुभद्राचा रथ मध्यभागी असतो आणि भगवान जगन्नाथ श्रीकृष्णाचा रथ मागे असतो. हे त्यांच्या रंग आणि उंचीवरून ओळखले जाते.
2. बलरामजींच्या रथाला ‘तलध्वज’ म्हणतात, ज्याचा रंग लाल आणि हिरवा आहे. देवी सुभद्राच्या रथाला ‘दर्पदलन’ किंवा ‘पद्मरथ’ म्हणतात, जो काळा किंवा निळा आणि लाल रंगाचा असतो, तर भगवान जगन्नाथाच्या रथाला ‘नंदीघोष’ किंवा ‘गरुध्वज’ म्हणतात. त्याचा रंग लाल आणि पिवळा असतो.
3. भगवान जगन्नाथाचा नंदीघोष रथ 45.6 फूट उंच आहे, बलरामजींचा तलध्वज रथ 45 फूट उंच आहे आणि देवी सुभद्राचा दर्पदालन रथ 44.6 फूट उंच आहे.
4. सर्व रथ कडुलिंबाच्या पवित्र आणि परिपक्व लाकडापासून बनवले जातात, ज्याला ‘दारू’ म्हणतात. यासाठी निरोगी आणि शुभ कडुलिंबाचे झाड ओळखले जाते, ज्यासाठी जगन्नाथ मंदिर एक विशेष समिती स्थापन करते.
5. या रथांच्या निर्मितीमध्ये खिळे, काटे किंवा इतर कोणत्याही धातूचा वापर केला जात नाही. रथांसाठी लाकडाची निवड बसंत पंचमीच्या दिवशी सुरू होते आणि अक्षय्य तृतीयेपासून त्यांची बांधणी सुरू होते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)