जय श्रीराम… आता प्रभू श्रीरामाचं सोन्याचं नाणं, नाण्यावर अयोध्येची प्रतिकृती
आपल्या देशात सोन्याला समृद्धीचे प्रतिक मानले जाते आणि लग्नसमारंभ, कौटुंबिक समारंभ, सणवारांमध्ये सोने मोठ्या दिमाखात परिधान केले जाते. विशिष्ट पद्धतीने निर्मिती केलेल्या या गोल्ड कॉइन किटच्या माध्यमातूनही श्री राम मंदिराच्या भव्यतेचा भाग होतो. गोल्ड कॉइन कलेक्शन किटच्या निर्माणासाठी केलेली सूक्ष्म कारागिरी, ज्ञान, समृद्धी, यश आणि उत्तम भाग्याचे प्रतिक आहे.
मुंबई : अयोध्येत भव्य राम मंदिराचे (Ram Mandir 2024) निर्माण होत आहे. संपूर्ण देशात राममय वातावरण झालेले आहे. देशातल्या पहिल्या क्रमांकाच्या सोन्याच्या प्लॅटफॉर्मच्या स्वरूपात ऑगमॉन्ट गोल्ड फॉर ऑलने आपली ओळख जपली आहे. ऑगमॉन्ट गोल्ड फॉर ऑलचे नवे सादरीकरण आहे श्री राम मंदिर कॉइन किट. हे किट संपूर्णपणे अयोध्येतील राम मंदिराच्या नवनिर्माणाला समर्पित आहे. या किटची निर्मिती विशेष प्रकारे केली आहे. अप्रतिमपणे साकारलेला चौरंग, कलात्मक पद्धतीने साकारलेली राम मंदिराची प्रतिकृती आणि राम मंदिर निर्माणासाठी एकत्र केलेल्या मातीचादेखील समावेश केला गेला आहे. ग्राहक हे किट ऑगमॉन्ट गोल्ड फॉर ऑलची वेबसाइट किंवा मोबाइल ॲपद्वारे देखील खरेदी करू शकतात. इतकेच नाही तर लोकांना हे घरपोच देण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
किती आहे या नाण्याची किंमत?
या कलेक्शन किटचं मध्यवर्ती आकर्षण म्हणजे एक विशिष्ट नाणं, जे ऑगमॉन्ट गोल्ड फॉर ऑलने विशेष स्वरुपात तयार केले आहे. श्री राम मंदिर कॉइन किट 7 ग्राम शुद्ध सोन्यापासून तयार केले आहे. याची किंमत 55,000 रुपये ठेवण्यात आली आहे पण एका विशेष ऑफरच्या अंतर्गत ग्राहक हे किट 52,751 रुपयांत खरेदी करू शकणार आहेत आणि यासह त्यांना 2000 रुपये किंमतीचा डिजीटल कॉइन मोफत दिला जाणार आहे. विशेष म्हणजे ज्यांना चांदीच्या खरेदीत रस असतो, अशा ग्राहकांकडेही विशेष लक्ष दिले गेले आहे. प्रभू श्री राम आणि त्याचबरोबर राम मंदिराशी संबंधित 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 50 ग्रॅम आणि 100 ग्रॅम चांदीची नाणी देखील खरेदी करता येणार आहेत. ऑगमॉन्ट गोल्ड फॉर ऑलच्या वतीने श्री राम मंदिर कॉइन किट उपलब्ध करण्याचे विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत, जेणेकरून या ऐतिहासिक वेळी सर्वसामान्य लोकांनाही स्वस्त दरात ते सहजपणे खरेदी करू शकतील.
आपल्या देशात सोन्याला समृद्धीचे प्रतिक मानले जाते आणि लग्नसमारंभ, कौटुंबिक समारंभ, सणवारांमध्ये सोने मोठ्या दिमाखात परिधान केले जाते. विशिष्ट पद्धतीने निर्मिती केलेल्या या गोल्ड कॉइन किटच्या माध्यमातूनही श्री राम मंदिराच्या भव्यतेचा भाग होतो. गोल्ड कॉइन कलेक्शन किटच्या निर्माणासाठी केलेली सूक्ष्म कारागिरी, ज्ञान, समृद्धी, यश आणि उत्तम भाग्याचे प्रतिक आहे.
ऑगमॉन्ट गोल्ड फॉर ऑलचे संचालक सचिन कोठारी म्हणतात, ” एकीकडे संपूर्ण देश राम मंदिर उद्घाटनाची प्रतीक्षा करत असतानाच ऑगमॉन्ट गोल्ड श्री राम मंदिर कॉइन किट लाँच करत आहे. प्रत्येक व्यक्तीला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा, हेच आम्ही या किटच्या माध्यमातून सुनिश्चित करू इच्छितो. या विशिष्ट किटमधील नाण्याच्या एका बाजूला श्री रामांची लहानशी प्रतिकृती दिसेल आणि दुसऱ्या बाजुला अयोध्येच्या प्रतिष्ठित मंदिराची झलक दिसेल. या किटमध्ये पवित्र राम मंदिराच्या गाभ्यातून घेतलेल्या मातीचाही समावेश आहे.
ऑगमॉन्टद्वारे तयार केलेल्या प्रत्येक नाण्याचे वैशिष्ट्य आहे की ते 24 कॅरेटमध्ये 999 शुद्धतेसह निर्मिले आहे. याचे पॅकेजिंक टॅम्पर-प्रूफ आहे. हे वजनाने हलके आहे आणि तुम्हाला घरपोच मिळण्याची व्यवस्था केली जात आहे. या नाण्यात साधेपणासह समृद्धी, भव्यतेची झलक दिसेल. याला अशा प्रकारे डिझाइन केले आहे की तुम्ही ते एका स्मृतिचिन्हाच्या रुपात जपून ठेवू शकाल असेही ते म्हणाले.