Krishna Janmashtami 2022 : भगवान श्रीकृष्णाची 5 महत्त्वाची मंदिरं, जिथं डोकं टेकलं की नशीब फळफळतं, असं म्हणतात!
भगवान श्रीकृष्णाच्या प्रसिद्ध अशा पाच मंदिरांबाबत जाणून घेणार आहोत, जिथं जाऊन डोकं टेकलं आणि देवाचं दर्शन घेतलं की नशीब फळफळतं, असा विश्वास भक्तांना वाटतो.
भगवान श्रीकृष्णाचा (Lord Sri Krishna) जन्म मथुरेत (Mathura) झाला. भगवान विष्णूचा अवतार म्हणून श्रीकृष्णाचा उल्लेख केला जातो. आज देशभरात भक्तिभावाने शेकडो मंदिरात श्रीकृष्णाची पूजा, आराधना आणि भक्ती केली जाते. अनेक पवित्र मंदिरात श्रीकृष्णाचं नामस्मरण केलं होतं. देशातील अशी काही श्रीकृष्णाची मंदिरं (Famous Temples of Lord Krishna) आहेत, जिथं गेल्यावर देवाचा आशीर्वाद घेतला की संकटं टळतात, दुःख दूर होतं आणि सुखाची प्राप्ती होते, असा विश्वास भाविकांच्या मनात आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या प्रसिद्ध अशा पाच मंदिरांबाबत जाणून घेणार आहोत, जिथं जाऊन डोकं टेकलं आणि देवाचं दर्शन घेतलं की नशीब फळफळतं, असा विश्वास भक्तांना वाटतो. चला तर जाणून घेऊयात..
श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर, उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशच्या मुथरा जिल्ह्यात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, अशी आख्यायिता प्रचलित आहे. याच ठिकाणी असलेलं भगवान श्रीकृष्णाचं मंदिर हे पवित्र स्थान मानलं जातं. दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्ठमीच्या दिवशी मोठ्या उत्साहात इथे पूजा केली जाते. श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर नावाचे हे मंदिर ओळखलं जातं दरदिवशी हजारोंच्या संख्येनं या मंदिरात भाविक दर्शनासाठी येत असतात. श्रीकृष्णजन्माष्टमीच्या दिवशी तर या मंदिर परिसरात जत्रेचा माहौल असतो.
इस्कॉन मंदिर, दिल्ली
श्री श्री राधा पार्थसारखी मंदिर अर्था अस्कॉन टेम्पल म्हणून हे मंदिर देशात अनेक ठिकाणी आहे. पण राजधानी दिल्लीत इस्कॉन मंदिराला विशेष महत्त्व आहे. दिवसभर इस्कॉन मंदिरात रहे राम हरे कृष्णा महामंत्राचा जप सुरु असतो. अत्यंत सुंदर वास्तुकलेचा नमुना इस्कॉन मंदिरात पाहायला मिळतो. इस्कॉन मंदिरा राधाकृष्ण यांच्यासोबत राम, सीता आणि लक्ष्मण यांच्याही दर्शनासाठी भाविकांची मोठा गर्दी होत असते.
बांके बिहारी मंदिर, उत्तर प्रदेश
वृंदावन इतं बांके बिबाहीर मंदिर आहे. श्रीकृष्णाच्या प्र्सिद्ध मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. भगवान श्रीकृष्णाच्या मनमोहक मृत्यूचं दर्शन घेऊन भाविक तृप्त होऊन जातात. फक्त देशातूनच नव्हे तर परदेशातूनही या मंदिरात दर्शनासाठी भाविक येत असतात. 1864 साली स्वामी हरिदास यांनी या मंदिराची निर्मिती केली होती.
भालका तीर्थ, गुजरात
गुजरात राज्यात सौराष्ट्रमध्ये असलेल्या भालता तीर्थ हे भगवान श्रीकृष्णाच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. भालका तीर्थ हे तेच ठिकाणा आहे, जिथं कृष्णाला आराम करतेवेळी एका शिकाऱ्याचा बाण लागला होता. उजव्या पायात बाण लागल्यानंतर श्रीकृष्णाने पृथ्वीसोडून वैकुंठात जाणं पसंत केलं होतं, अशीही आख्यायिका सांगितली जाते. भालका तीर्थमध्ये दर्शन घेतल्यास सर्व पापांमधून मुक्ती मिळते, असा समज भाविकांमध्ये आहे.
द्वारकाधीश मंदिर, गुजरात
भारताच्या प्राचीन कथांमध्ये द्वारकास्थीत मंदिराचं महत्त्व अधोरेखित कऱण्यात आलं. गुजरातमध्ये असलेल्या या भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात द्वारकाधीशाच्या रुपातील कृष्णाची पूजा केली जाते. सर्व संकटातून, पापांमधून मुक्ती देणारा देव म्हणून द्वारकाधीश मंदिरात भक्तगण दर्शनासाठी येत असतात, असं सांगितलं जातं.
धर्म आणि अध्यात्माशी संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
(टीप : वरील मजकूर उपलब्ध माहितीच्या आधारे संपादीत करण्यात आला आहे. ही माहिती वैज्ञानिक प्रमाण नसून सर्वसामान्य माहितीच्या माहितीच्या दृष्टीकोनातून सदर लेख साकारण्यात आला आहे.)